

✒️ चांदूआंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949
नायगाव(दि.15सप्टेंबर):-प्रहार दिव्यांग संघटना नायगाव तालुक्याच्या वतीने 3%,5% निधी, सं गां यो, मनरेगा, घरकुल,अंत्योदय या व अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात 28 सप्टेंबर 2020रोजी सोमवारी लाॅकडाऊन सत्याग्रह व ऊपोषन करण्याचा धाडसी निर्णय नायगाव तालुक्यातील दिव्यांगांनी घेतला आहे.
दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले असुन मा़ तहसीलदार मॅडम यांची ऊदासीनता व गट विकास अधीकारी यांची निष्क्रीयता यामुळे तालुक्यातील दिव्यांगांचे प्रश्न आडगळीला पडले आहेत,वारंवार अर्ज ,विनंत्या,निवेदन देऊन सुद्धा दिव्यांगांच्या प्रश्नांवर म्हणावा तसा विचार झाला नसल्या मुळे आज आम्हा दिव्यांगांना लाॅकडाऊन सत्याग्रह ऊपोषनाचे शस्त्र ऊपसण्याची वेळ आली असल्याची खंत साईनाथ बोईनवाड यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील बहूसंख्य दिव्यांगांनी या परीवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले,तसेच या आंदोलनास विविध राजकिय पक्ष पाठींबा देणार असून काल तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिव्यांगांनी प्रशासनाला 25 सप्टेंबर पर्यंतचा अल्टीमेटम दिला असुन निवेदनावर साईनाथ बाबाराव बोईनवाड (तालुका अध्यक्ष नायगाव) ,माधव कोसंबे(ऊपाध्यक्ष नायगाव), श्रीराम पा पवार ( नांदेड जि अध्यक्ष),मारोती मंगरूळे (नांदेड जि सचिव), गोपीनाथ आंबटवार (जि कार्याध्यक्ष नांदेड), राजेश बेळगे (सं प्र नांदेड) मिलींद कागडे ,(उपाध्यक्ष नांदेड) चांदू आंबटवाड ( नायगाव ता़ प्रतिनीधी पुरोगामी संदेश व दिव्यांग शक्ति ) माधव लालवंडे ईत्यादींच्या सह्या केलेले पत्र देण्यात आले.