विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे

17

आजच्या एकविसाव्या शतकात वाढत्या जागतिकीकरणात आपण स्पर्धेला सामोरे जात आहोत. विशेषतः शैक्षणिक
क्षेत्रात नवनवीन पर्याय निर्माण होत आहेत. पूर्वीपासूनच आपल्या देशातील शैक्षणिक संस्था विद्यापीठे व त्यामधून शिक्षण घेऊन आपले विद्यार्थी आज जागतिक पातळीवर यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामध्ये विज्ञान, संगणक, पर्यावरण, सामाजिक शास्त्र, तसेच आरोग्य यामध्ये विद्यार्थी नवनवीन आव्हानांना सामोरे जाऊन आज उच्च पदावर आहेत. आजचे यशस्वी विद्यार्थी उद्याचे भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत. परंतु अनेक प्रश्न विकासाच्या आड येत आहेत. बेरोजगारी दहशतवाद व्यसनाधिनतादुष्काळ या समस्या आहे.

तेव्हा आज विद्यार्थ्यांना परिपूर्ण व दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे शेती हा आपला अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तेव्हा आधुनिक शेती तंत्रज्ञांनाच्या मुळे दुष्काळासारख्या गंभीर प्रश्न उत्तर मिळेल असे उपाय करणे गरजेचे आहे. याचे सकारात्मक परिणाम नक्कीच होताना दिसतील. आपली भारतीय संस्कृती जगालाही ठेवा वाटणारी आहे व दर्जेदार शिक्षण यांचा समतोल राखणे हे विद्यार्थ्यांची आद्य कर्तव्य आहे पर्यावरण संवर्धन, आरोग्य यामध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन निर्माण होणारे विद्यार्थी या समस्यांवर नक्कीच उपाय शोधतील. ‘मेक इन इंडिया’, ‘स्वदेशीचा पुरस्कार’ यामध्ये विद्यार्थी यशस्वी होऊन आपल्या देशाला जागतिक पातळीवरील स्थान मिळवून देतील. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, त्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाव देणे, यामुळे आपले विद्यार्थी हे देशातच राहून परकीय आव्हानांना खंभीर पर्याय निर्माण करतील. युवकाबरोबरच स्त्री
शिक्षणासाठी शासनाने नवनवीन योजना आखणे गरजेचे आहे. तसेच प्रौढ साक्षरता यामध्ये सामान्य नागरिकांनाही शिक्षणाचे महत्त्व कळून तेही देशाच्या विकासात सहभागी होतील. विषेशतः विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या शिक्षणाचा पायाच भक्कम असेल तर यशाचे शिखर उत्तम असेल.

तेव्हा त्यांच्या प्राथमिक शिक्षणातच विविध विषयांची सखोल ज्ञान दिले तर त्यांना भविष्यातही याचा नक्कीच फायदा होताना दिसेल. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांच्या ताणामुळे नैराश्य हा गंभीर आजार दिसून येत आहे, तेव्हा प्राथमिक स्थरावर शारीरिक व मानसिक ज्ञान दिले तर ते स्पर्धेच्या जगात आपले भविष्य यशस्वी करताना दिसतील. आपल्या देशाला अनेक थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात महापुरुषांचे विचार, स्वातंत्र्याचे महत्त्व, देशासाठी सर्वतोपरी त्याग बलिदान यांची शिक्षण दिले तर विद्यार्थी स्वयंपूर्ण व आत्मविश्वास होती. त्यामुळेच आपला देश जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून नक्कीच उद्या असेल यात तिळमात्र शंका नाही.

✒️लेखक:-अमोल मांढरे ,वाई,सातारा
मो.नं. ७७०९२४६७४०

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
(अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)
मो:-९४०४३२२९३१