लोळदगाव गायरान वस्ती ते मादळमोही रस्त्याची झाली दयनीय अवस्था – बाबुराव भोईटे

18

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.16सप्टेंबर):-तालुक्यात लोळदगाव गायरान वस्तीत जाण्यासाठी रस्ता नाही निवडणूक आली की तुमचा रस्ता मंजूर करू असे आश्वासन दिले जाते अनेक नेत्यांना वाटते निवडणुका तोंडावर आल्या आहेत लिंबाच्या ट्रका देणे बंद करा रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून स्वतः रस्ता तयार करून देणार लवकरच गावकरी यांच्या हस्ते उद्घानप्रसंगी जेसीबी, ट्रॅक्टर, हायवा यांच्या माध्यमातून स्वतः जनतेचे प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख बाबुराव भोईटे यांनी सांगितले भारत स्वतंत्र झाल्यापासून या वस्तीवर रस्ता झाला नाही.

पावसाळ्यात रस्ता बंद होतो या लोकांनी कस जीवन जगायचं एखाद्या व्यक्ती आजारी पडली की दवाखान्यात जायचं कसं या लोकांचं या रस्त्यामुळे जीवन जगणं अवघड झालंय तरी नेते मंडळी ने या रस्त्याकडे लक्ष न देता काही विभागामार्फत या रस्त्याचा निधी हडप करण्याचा लपंडाव चालवला जातो जर रस्ता नाही केला तर बंगल्यासमोर आंदोलन करणार बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता खाणाऱ्या भ्रष्ट अधिकारी,सभापती, नेता यांचे घरासमोर उग्र असे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष गेवराई बाबुराव भोईटे यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले.