पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचा पहिला व दुसरा हप्ता वितरित करावा – आमदार संतोषराव बांगर

29

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

कळमनुरी(दि.16सप्टेंबर):-विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ नगरपंचायत जिल्हा हिंगोली येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 644 घरांना मंजुरी मिळाली आहे. या मंजूर झालेल्या बांधकामासाठी पहिला व दुसरा हप्ता निधी वितरित करावा अश मागणीचे आमदार संतोषराव बांगर यांच्यावतीने गृहनिर्माण मंत्री मा‌.जितेंद्र आव्हाड यांना पत्र देण्यात आले आहे.

तसेच गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांना भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर निधी वितरित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला द्यावे असे सांगितले असता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लवकरच घरकुल लाभार्थ्यांना निधी वितरित केला जाईल असे आश्वासन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषराव बांगर यांना दिले.