मानवाधिकार संरक्षण समितीचे सातारा जिल्हा व शहर जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम

98

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.16सप्टेंबर):- मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे पश्चिम महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी माननीय श्री .गजानन भगत साहेब यांच्या शुभ हस्ते फित कापून सातारा येथील 2 प्रियांका काॕर्नर,अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाजवळ सदरबझार कॕम्पमध्ये मानवाधिकार संरक्षण समितीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सातारा शहर अध्यक्ष सुशील भोसले व सातारा शहर सचिव कुशल रोहिरा यांना पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी माननीय श्री.गजानन भगत साहब यांचा हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी सातारा जिल्हा जनसंपर्क आधिकारी मा.श्री .अशोकराव हारे साहेब ,सातारा जिल्हा सचिव मा.श्री .डाॕ.अमोल जाधव साहेब ,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.दिपकराव जगदाळे साहेब ,सातारा जिल्हा संघटक मा.श्री.पवार साहेब ,सातारा जिल्हा समितीचे सदस्य श्री.अतुल जाधव,सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका सदस्य श्री.भैया खराडे उपस्थित होते. मानवी हक्कांच्या रक्षणार्थ जे अनेक ठराव करण्यात आले आहेत, त्यांचा हेतू व्यक्तीला आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची क्षमता देण्याचा आहे.

उदा., राजकीय व नागरी हक्क ठराव, मानवी हक्कांच्या पायमल्लीबाबतच्या तक्रारींची निःपक्षपणे चौकशी करून निर्णय देणारी समिती इ. ठरावांनी स्थापन केली आहे.मानवी हक्कांच्या रक्षणार्थ जे अनेक ठराव करण्यात आले आहेत, मानवा च्या हक्का साठी लढणारी समिती व लोकांना त्यांचे हक्क समजून देणे. सर्व सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक त्यांना न्याय मिळवून देणे हेच मानवाधिकार चे मूळ सकारात्मक हेतू आहे.