माजलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी वैजनाथ जाधव यांची निवड करावी – बाळासाहेब गरड

15

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

सिरसाळा(दि.16सप्टेंबर):-माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पद हे अशोक आबा डक यांची मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यामुळे रिक्त झाले आहे. या सभापतीपदी पदावर वांगी गावचे माजी सरपंच वैजनाथ जाधव यांची निवड करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरड यांनी केली आहे. आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ट व सामाजिक कामामध्ये अग्रेसर आसतात त्यामुळे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी वैजनाथ जाधव यांची सभापतीपदी निवड करावी.माजलगाव तालुक्यातील वांगी येथील वैजनाथ जाधव हे आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

दिंद्रूड पंचायत समिती गटामध्ये चांगला जन संपूर्ण आहे सरपंच संघटनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षे आ. प्रकाश दादा सोळंके,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निस्वार्थपणे ते काम करत आहेत. तसेच वांगी बु) गावचे सरपंच पद त्यांनी भुषविले आहे.त्यांच्या सरपंच पदाच्या काळात गावात चांगलीं विकास कामे केली आणि आजही गावात अनेक प्रश्न ते स्वतः जातीने लक्ष घालून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात वांगी गावातून अनेक लोकसभा,विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून दिले आमदार प्रकाश दादा सोळंके व पक्षाशी एकनिष्ठचे फळ वैजनाथ जाधव यांना सभापती पदाच्या माध्यमातून मिळावे अशी मागणी बाळासाहेब गरड यांनी केली आहे.