शेतीवर आधारीत उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

31

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16सप्टेंबर):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या सहा दिवस कालावधीचे शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शेतीवर आधारीत उद्योग संधी पशुधनावर आधारीत उद्योग, संधी यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, उद्योगाचे व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया, पशुधन, उद्योगाची निवड, शासनाच्या विविध योजनाची माहिती, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयावर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतीनी त्वरीत दि. 3 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड (मो.न. 9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं. 94011667717), लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.