बांबू आर्टिकल्स प्रशिक्षण कार्यक्रम

28

🔹युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16सप्टेंबर):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 5 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर (दोन आठवडे ) कालावधीचे ऑनलाईन बांबू व बांबू आर्टिकल्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

प्रशिक्षणामध्ये बांबू पासून नाविन्यपूर्ण वस्तू निर्मिती करणे, उद्योगसंधी मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनाची माहिती, समस्यांचे निराकरण, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी, कार्यप्रणाली, यशप्राप्ती, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक-युवतींनी त्वरीत 3 ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, (मो.नं. 9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो. नं. 94011667717), लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.