कोरोना लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या कोविड-19 संसर्ग झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरण करण्याची परवानगी द्यावी – आमदार संतोषराव बांगर

30

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.16सप्टेंबर):- जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग झालेले रुग्ण अतिशय जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे व डॉक्टर कमी असल्यामुळे रुग्णांमध्ये सिरीयस रूग्णांना डॉक्टरांचा वेळ व उपचार मिळण्यास दवाखान्यात जास्त रुग्ण असल्यामुळे गरजू रुग्णांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाच्या रिवाईज रिव्हाईडज गाईडलाईन्स नुसार अति सौम्य व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वतःच्या घरीच विलगीकरण करण्यात यावे अशी मागणी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर, हिंगोली चे नगरसेवक रामभाऊ कदम,हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे,नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अनिल नेनवाणी, बालाजी घुगे, यांच्यासह डॉ.जे.डि.देशमुख, डॉ.पवार,डॉ.तापडिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.