ऊसतोड मजुरांना आमदार सुरेश धसांनी रोखलं

31

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.16सप्टेंबर):-ऊसतोड कामगारांना दीडशे टक्के भाववाढ मिळेपर्यंत ऊसतोड मजुरांनी संप पुकारलाय. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून नगरकडे येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या टोळीला, भाजप आमदार सुरेश धस यांनी कारखान्यावर जाण्यास रोखलं आहे. या वाहनातून जवळपास चारशेहून अधिक मजूर कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर निघाले होते. याच दरम्यान बीड नगर सीमेवर सुरेश धस यांनी मजुरांना रोखल आहे.

कारखाना बंद असताना देखील मजूर वाहतुकीची घाई कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून सरकार जोपर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादमाच्या वाढीबाबत निर्णय घेत नाही. तोपर्यंत ऊसतोड मजूर कारखान्यावर जाऊ देणार नाही. असा पवित्रा सुरेश धस यांनी घेतलाय. संप शांततेत सुरू आहे. अशा पद्धतीने कारखानदार मजुरांची वाहतूक करणार असतील तर संप अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा धसांनी दिलाय.दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केलीय.