✒️परभणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

परभणी(दि.16सप्टेंबर):-मराठा सेवा संघ प्रणित डाॕ.पं.दे.राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र द्वारा मा.ना.वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य ह्या परभणी दौऱ्यावर असतांना शिक्षकांच्या विविध १९ मागण्यांसंदर्भात संघटनेद्वारा निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

१) सन २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी. २) आदिवासी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांना भाडे माफ निवास योजना लागू करण्यात यावी.३) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देण्यात यावे. ४) सर्व मुलांना सरसकट मोफत शालेय गणवेश देण्यात यावे. ५) शाळांचे विद्युत बिल ग्रामपंचायतद्वारा वित्त आयोगाच्या माध्यमातून भरण्यात यावे. ६) वर्ग ६ ते ८ साठी स्वतंत्र इंग्रजी विषयाचे शिक्षक देण्यात यावे. ७) जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक विशेष वेतनवाढ देण्यात यावी. ८) केंद्रप्रमुखांना शाळाभेटी व विविध बैठकांसाठी भत्ता मंजूर करण्यात यावा. ९) शिक्षकांना इतर शाळाबाह्य कामातून वगळण्यात यावे. १०) केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. ११) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रनेमार्फत राबविण्यात यावी.१२) दारिद्रय रेषेखालील मुलींचा उपस्थिती भत्ता १ रुपया वरुन १० रुपये वाढ करण्यात यावा. १३) शिक्षकांचे वेतन दर महिण्याच्या १ तारखेला करण्यात यावे. १४) सातव्या वेतन आयोगातील पदविधर शिक्षकाचे वेतन उपशिक्षकापेक्षा कमी करण्यात आले आहे ते दुरुस्त करण्यात यावेत.१५) शिक्षणसेवकाचे मानधन २५०००/-रु. करण्यात यावे. १६) सर्व पात्र प्राथमिक शिक्षकांना बिनाअट निवडश्रेणीचा लाभ देण्यात यावा. १७) कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येवू नये. १८) बिंदु नामावली तपासून अध्यावत करण्यात यावी. १९) डीसीपीएस चा मागील सर्व हिशोब झाल्यानंतरच एनपीए खाते उघडून कपात करण्यात यावी.

या सर्व मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन सोडविण्यात याव्या अशी विनंती करुन सोडविण्यात याव्यात असे मंत्रीमहोदयांना मराठा सेवा संघ प्रणीत डाॕ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र राज्य द्वारा प्रत्यक्ष निवेदन देवून विनंती करण्यात आली. या प्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व प्रदेश संघटक बाळासाहेब यादव यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED