चारचाकी वाहनाच्या धडकेत ब्रह्मपुरी येथील युवक ठार

12

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.17सप्टेंबर):-आरमोरी रोड उदापूर स्टेट बँक जवळच नाग मंदिर समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला मागेवून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना आज 16 सप्टेंबर रोजी रात्री7.30 वाजताच्या सुमारास घडली. दिनेश काळे (40) रा. ब्रम्हपुरी असे अपघात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक दिनेश काळे हा सेक्युरिटी गार्ड असून याचा रोजच्या वेळेप्रमाणे रात्रौ 7 वाजता आपल्या ड्युटीवर जात असतांना रात्री 7ते 7.30 दरम्यान आपल्या यामाहा एमएच 31 डी जे 4517 क्रमांकाच्या दुचाकीने ड्युटीवर जात असतांना 7 ते 7.30 दरम्यान आरमोरी मार्गे भरधाव वेगाने चारचाकी वाहनाने दिनेश काळे याला पाठीमागून जबर धडक दिल्याने मुख्य रस्त्यावर जाऊन वेगाने पलटी मारली. या धडकेमध्ये दिनेश काळे यास डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला खासगी वाहनाने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रूग्णालय ब्रम्हपूरी येथे भरती करण्यात आले असता डाॅक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले.

असून दिनेश च्या अपघाती मृत्यूने ब्रम्हपुरी येथे खळबळ माजली आहे. त्याच्या पच्छात पत्नी,मुलगा असा बराचा मोठा आप्त परिवार आहे व पुढील घटनेचा अधिक तपास ब्रम्हपुरी पोलिस उप निरीक्षक अश्विन खेडीकर इतर पोलीस करीत आहे.