🔸मराठा समाजातील जागरुक कार्यकर्त्यांनी दिले तहसिलदार यांना निवेदन

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.17सप्टेंबर):-मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यात ठीक ठिकाणी ग्रामपंचायत ते जिल्हाधिकारी कार्यालय घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्याच धर्तीवर केज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.17/09/2020 रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार केज यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर हनुमंत भोसले, शिवाजी ठोंबरे, राहुल खोडसे, शेखर थोरात, योगेश अंबाड, पद्माकर सावंत,गोंविंद सपाटे,संदीप शितोळे गणेश थोरात,ऋषिकेश गलांडे,गजानन गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED