राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अशोक जाधव धनगांवकर यांची निवड करण्याची मागणी

28

✒️अंगद दराडे(बिड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बिड(दि.17सप्टेंबर):-देश स्वतंत्र झाल्यापासून भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये गणल्या जाणाऱ्या गोपाळ समाजातील एकाही व्यक्ती ला आमदारांकी पर्यंत पोहचता आले नाही. विविध विमुक्त जाती भटक्या जमाती ,ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गोपाळ समाजाचे नेते तथा भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष अशोक जाधव धनगांवकर याची 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त आदिवासी ओबीसी समाजाच्या वतीने मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या कडे होत आहे.

अशोक जाधव धनगांवकर हे बऱ्याच वर्षांपासून गोर गरीब समाजासाठी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे.
त्यानी भटक्या विमुक्त समाजाचे नेते स्व. आसाराम गुरजी जाधव, स्व. मोतिराज राठोड, औरंगाबाद, माणिकराव लोणारे येवला, जि. जि. चव्हाण नासिक, रमेश श्रींखडे धुळे,साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,भाऊ कोरडे, डॉ. कैलाश गोंड मुंबई,माजी आमदार लक्षण माणे सातारा, व्यंकटराव अवधूत पुणे, रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, ,मच्छिंद्र भोसले मंगळवेढा सोलापूर,सुधिर अनवले,राजेंद्र वनारसे,लातुर, शिवाजीराव शेलार ,अर्जुन गोत्राळ,अहमदनगर,गोपाळ समाजाचे युवा नेते झेंडू पवार शिरुर पुणे, जेष्ठ नेते पुंडलिक धनगर वाशीम यांच्या सोबत चळवळीत काम केले आहे.

चळवळीत काम करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा, नासिक येथील मेळावा, चाळीसगाव येथील बिऱ्हाड मोर्चा, मुंबई येथील हायकोर्टावरचा मोर्चा, नागपूर येथील झोळीदान मोर्चा, औरंगाबाद जिल्ह्यातील सिमा राठोड प्रकरणावरील मोर्चा, तसेच बऱ्याच मोर्चा त हिरारीने भाग घेतला आहे. तसेच संघटनेच्या माध्यमातून पुणे येथील शनिवार वाड्यावरचा मेळावा, नांदेड येथील मोढा मैदानावर मेळावा, नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर मेळावा, उंटखाना मैदानावर आदिवासी मैळावा, औरंगाबाद येथील आमखास मैदानावर मेळावा, मुंबई येथील आझाद मैदानावर, मेळावा, नेरळ येथील मुस्लिम समाजाचा मेळावा असेल असे किती तरी मेळाव्यात समाज प्रबोधनाचे काम करुन संमाज एकत्रित करून समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव म्हणून सुद्धा काम केले आहे. व पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहे. ते समाजाच्या चळवळीत 1988 पासून तळमळीने काम करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मेल आयडीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती जमातीतील लोकांनकडून निवेदने पाठवून अशोक जाधव धनगांवकर यांना विधानपरिषदेचे आमदार म्हणून नियुक्त करण्यासाठी राज्यपाल साहेबांच्या कडे राज्यमंत्री मडंळाच्या माध्यमातून शिफारस करावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.

स्वातंत्र्याची ७३ वर्षे उलटून गेली तरीही आजपर्यंत भटक्या विमुक्त समाजाची परवड होतच असुन भटक्या विमुक्त साठीचे अनेक आयोग नेमले गेले व त्यांच्या शिफारशी देखील केंद्र सरकार कडे त्या त्या आयोगाने पाठवल्या आहे परंतु त्यावर अजून कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. म्हणून चळवळीत सक्रिय काम करणाऱ्या चळवळीचे नेते अशोक जाधव धनगांवकर यांना आमदार करून नियुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख गोरख गव्हाणे,गोपाळ समाजाचे नेते मेजर भानदास धनगर अहमदनगर ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय भाऊ चव्हाण, महाराष्ट्रप्रदेश गोधळी समाजाचे नेते रामदास कटक,नांथजोगी समाजाचे नेते सोमनाथ धायडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिल धमने नांदेड, कर्मचारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मेजर धनसिंग गव्हाणे अहमदनगर,वासुदेव समाजाचे युवा नेते अनिल चव्हाण, जानवी मेस्त्री महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष,तिरमल समाजाचे नेते तथा विदर्भ संघटक कैलास वरेकर, अमरावती विभागाचे प्रमुख भानुदास पवार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतिष कालापाड, वासिम जिल्हा अध्यक्ष विनोद नवघरे,जयेंद्र नाथ चव्हाण गोंदिया जिल्हा अध्यक्ष, सभाष काशिवार गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष, संजय कुमार दुधपचारे गोंदिया जिल्हा संघटक, राजु भौर अकोला जिल्हा अध्यक्ष, गिरीश मडावी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, डॉ सुरेश शिन्दे मराठवाडा अध्यक्ष, राम भिंगारे मराठवाडा संघटक, अमोल वाकोडे नांदेड जिल्हा अध्यक्ष ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रुद्राक्ष वाकोडे, जालना जिल्हा अध्यक्ष धर्मराज बाबर, बिड जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जाधव, शिक्षक आघाडी बिड जिल्हा अध्यक्ष धर्मराज गव्हाणे,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष गोपाळ कानडे ,पुणे जिल्हा अध्यक्ष अमित पंडित,आदि सह भटक्या विमुक्त जाती जमाती, ओबीसी, एसबीसी, आदिवासी, दलित, बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.