दोन्ही डगरीवर पाय ठेऊन किती दिवस प्रवास करावा ?

11

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेब यांच्या संदर्भात नेहमीच संशयातीत वातावरण राहिले आहे…!!
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५च्या निवडणूकीत सार्वजनिक सभेत जाहिररित्या शरद पवार साहेबांवर गंभीर आरोप केले होते,की दाऊद इब्राहिम यांना कुणी पाकिस्तान मध्ये पोहोचविले ते सांगा…???
या आरोपांचे कधीच खंडन केल्या गेले नाही.आणि त्याचे निराकरणही झाले नाही…!!
तेलगी स्टॅंप घोटाळ्याच्या वेळी सुद्धा अनेक पत्रकारांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केला मात्र तेंव्हाही कोणतेच ऊत्तर मिळाले नाही…!!

मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो.रा.खैरनार यांनीही शरद पवार साहेबांवर जाहिर आरोप केले मात्र त्यांच्या आरोपांनाही कधीच ऊत्तर मिळाले नाही…!!
भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अण्णा हजारे यांनी सुद्धा बरेचदा आरोप केले आणि उपोषणाला बसले परंतु त्यांच्या ही आरोपांचे कधीच खंडन केल्या गेले नाही…!!
वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, १० सप्टेंबर २०१९ ला दिल्लीत सोनिया गांधी,अमित शहा, नितिन गडकरी आणि शरद पवार यांची गुप्त बैठक झाली,त्या बैठकीत काय ठरले ते सार्वजनिक करा…!!
ही बैठक झाली की, नाही झाली या बाबत कुणीच खुलासा केला नाही…!

वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर हे चुकीचा आरोप करीत आहेत म्हणून त्यांच्या आरोपांचे खंडन सुद्धा कुणीच केले नाही…!!
या सर्व घडामोडींतुन काय संदर्भ घ्यावा..???
मा.शरद पवार साहेब हे नेमके कोणत्या विचारधारेचे आहेत याबाबत सभ्य लोकांच्या मनात नेहमीच संभ्रम राहिला आहे…!!
शरद पवार साहेब सेक्युलर विचारांचे आहेत असा समज करून घ्यावा तर मग ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि आरएसएसच्या लोकांना घेऊन गुप्त बैठका कशासाठी घेतात हा प्रश्न “आ” वासुन ऊभा राहतो…!!
मा.शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे असे समजावे तर मग शरद पवार साहेब २०१४ ला महाराष्ट्रातील भाजपच्या फडणवीस सरकारला जाहिररित्या बिनशर्त पाठिंबा कशासाठी देतात…??

शरद पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सेक्युलर विचारांचा आहे असा समज करून घ्यावा तर २०१९ मध्ये रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी शपथविधी कशी घेतली,?? कशासाठी घेतली आणि ही कृती राजकीय तत्वज्ञानात बसते काय..??
एक नाही अनेक प्रश्न जीथं अनुत्तरित असतात तिथं संभ्रम कायम असतोच…!!
बोलायचे एक मात्र वागायचे दुसरेच…!!
हा धुर्त खेळ लोकशाहीमध्ये लोकांच्या भावनांची आणि अपेक्षांची राख रांगोळी करतोय…!!

सांसदीय लोकशाहीला सत्तेचे विकेंद्रीकरण अभिप्रेत आहे,मात्र इथं सत्तेला काही कुटुंबात बंदिस्त करण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांपासून काही जातींचे आणि धर्माचे ठेकेदार आटोकाट प्रयत्न करीत आले आहेत…!!
याकामी अनेक नेत्यांनी सोंग घेतलेले आहे…!!
कुणी मी सेक्युलर आहो असे दाखवितो मात्र तो पक्का जातियवादी किंवा धर्मांध विचारधारेचा वाहक असतो हा अनुभवानेच सिद्ध झालेला संकेत भारतीय नागरिकांनी पुर्तेपणी समजून घ्यावा अशी वेळ आली आहे…!!
लोकशाहीचे सामाजिकीकरण करायचे असेल आणि सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या खुर्चीत बसायचे असेल तर आता सोंगी, ढोंगी नेतृत्व तथा पक्ष यांना जोखुन पुढे जावे लागेल…!

सत्तेसाठी पांघरलेले बुरखे आता बेनकाब केले पाहिजे अशी वेळ येऊन ठेपली आहे…!!
दोन डगरीवर पाय ठेऊन चालणारांना त्यांची जागा दाखवून दिली तरच लोकशाहीचे सामाजिकीकरण होईल अन्यथा संधीसाधू नेत्यांनी लोकशाही आपल्या घराण्याच्या परिघात बंदिस्त केली आहे हे वास्तव तुम्ही नाकारु शकता का…??
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
(राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो:-99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185