सौ.विद्या घटे (बारई) यांना पी.एच.डी. पदवी

10

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17सप्टेंबर):-सौ.विद्या अभय घटे ( बारई ) यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून नुकतीच गणित विषयातील पी.एच.डी पदवी प्राप्त केलेली आहे. ‘ थर्मोइलास्टीक ॲनालिसिस आॕफ सेमी- इनफायनाईट साॕलीड माॕडेल्स’ ह्या टाॕपिकवर प्रा. डाॕ. माधव वरभे ( सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही) यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संशोधन केलेले आहे.

त्यांच्या यशाबद्दल श्रीमती सुमन रा. घटे, विजय घटे, घटे परिवार , बारई परिवार तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सदस्यांनी सौ. घटे यांचे अभिनंदन केलेले आहे.