पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

16

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी,जिवती)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.17सप्टेंबर):- पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस कोरपना तालुका भाजपाच्या वतीने वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

माननीय माजी वित,नियोजन,वन तथा पालकमंत्री आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात कोरपना तालुका अध्यक्ष भाजपा श्री नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात कोरपना ग्रामीण रुग्णालय याठिकाणी रुग्णांना फळ वाटप तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

यावेळी कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर , पुरुषोत्तम भोंगळे, किशोरभाऊ बावणे, अरुण मडावी,डॉ पुरी ग्रामीण रुग्णालयात कोरपणा,शशिकांत आडकिने, अमोल आसेकर ,ॲड पवन मोहितकर, ओम पवार,बालुभाऊ पानघाटे,दिनेश खडसे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा मोर्चा पदाधिकारी कार्यर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.