युवा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वर्षाताई गायकवाड यांना निवेदन

    92

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

    सेनगाव(दि.18सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.वर्षाताई गायकवाड या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या असता हिंगोली येथील सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल या शाळेने मनमानी कारभारातून 400 विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुप वरून काढण्यात आले होते.

    त्या संबंधित शाळेवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून इतर शाळा विद्यार्थ्यांवर अन्याय करणार नाही यासाठी प्रहार युवा आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले.

    निवेदन देते वेळेस प्रहार युवा जिल्हाप्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष प्रदीप वानरे, श्याम पवार हे उपस्थित होते.