✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.18सप्टेंबर):-वैराग्याचा पुतळा, ज्यांनी फुलवला संपुर्ण महाराष्ट्रात भक्तीचा मळा,महाराष्ट्र सारस्वतःचा व वारकरी भाविकांची जीवन कळा असणारे संत श्रेष्ट तुकाराम महाराज देहुकर यांचा आमली पदार्थ बीडीवर चक्क फोटो टाकुन आमचे संस्कृतीचे पंचप्राण असणारे संत व वारकरी भाविकांचे अस्मितेवरच हा घाला घातलेला आहे.

आम्ही महाराष्ट्र वारकरी महामंडळ येवला तालुक्याचे वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो,” अशी प्रतिक्रिया येवला तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभपश्री.विठ्ठल आण्णा शेलार विखरणीकर यांनी व्यक्त केली. “तर या बीडी उत्पादकाने लवकरात लवकर संत श्रेष्ट जगदगुरु तुकोबाराय यांचे नांव हटविले नाही तर आम्ही जिल्हाअध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर,प्रदेशाध्यक्ष आर.के.रांजणे,कार्याध्यक्ष हभपश्री.रामेश्वर महाराज शास्री यांचे नेतृत्वाखाली जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडु तरी शासनाने या महाभागास वेळीच समज द्यावी व यापुढे असे घृणास्पद कृत्य करु नये,अशा प्रकाराची वाटते आम्हाला खंत,परंतु आमचे पाठीशी आहेत महान महान संत,आमचा सरळ मार्गाने जाणारा आहे वारकरी पंथ,दिशा देणारे आहेत धर्मग्रंथ,यापुढे सरळ करु आम्ही असे जंत असा ईशारा येवला तालुका उपाध्यक्ष हभपश्री.अंबादास महाराज जगताप यांनी येवला येथे तहसिल कार्यालयात निवेदन कार्यक्रम प्रसंगी दिला.

यावेळी हभपश्री.बाळासाहेब महाराज शेटे कानडीकर,हभपश्री. भाऊसाहेब महाराज ठोंबरे,हभपश्री.कौतिक पगार,हभपश्री.वाल्मिक पुरकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED