नांदेडकरांची आरोग्यवाहिनी डॉ. शंकरराव जी चव्हाण शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी कोविड रूग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर

25

🔸१० के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक क्षमता वृध्दीचा रूग्णांना होणार लाभ

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18सप्टेंबर):-वाढत्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येमुळे विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये पालकमंत्री मा.ना.अशोकराव जी चव्हाण साहेब यांनी व जिल्हा प्रशासनाने गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता व्हेंटिलेटर व अन्य अतिरिक्त उपकरणे उपलब्ध करून दिलेले आहेत, तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते.

वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने मा.ना.अशोकराव जी चव्हाण साहेब यांनी तात्काळ दखल घेत १० हजार लिटर ऑक्सिजन टँकची क्षमता वाढवली व त्याचे उद्घाटन देखील काल पार पडले सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे.

यासोबतच अतिरिक्त ११० बेडचे कोव्हिडं केअर सेंटर चा लोकार्पण सोहळा देखील पार पडला यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांना बेड न मिळण्याची सर्वात मोठी समस्या दूर झाली असून रुग्णालयाला आरोग्यदायी बळ मिळाल्याचे मी नमूद करू इच्छितो…
यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो.. डॉ. शंकरराव जी चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय हे माझ्या मतदारसंघात असल्याने व विशेषतः माझी जन्मभूमी विष्णुपुरी येथे असल्या कारणास्तव माझी जबाबदारी ही साहजिकच सर्वस्वी वाढलेली आहे, वदिवसेंदिवस वाढत्या रुग्णांमुळे रुग्णांचे नातेवाईक फोनद्वारे या समस्या मला सुचवायचे रुग्णालयाला सहकार्य करून या समस्यांच तात्काळ निराकरण केल्याबद्दल पालकमंत्री श्री. अशोकराव जी चव्हाण साहेब यांचे मी आभार मानू इच्छितो.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. डॉ. विपीन ईटनकर जी आ.अमरनाथ राजूरकर जी आ.बालाजीराव कल्याणकर नांदेड चे पोलीस अधीक्षक मा.विजयकुमार मगर रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री.डॉ. सुधीर जी देशमुख अतिरिक्त उपाधिष्ठाता डॉ. चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.