वीज पडून पती – पत्नी जागीच ठार

28

🔺ब्रम्हपुरी मध्ये काळाचा घात – पारडगाव येथिल दुर्दैवी घटना

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.18सप्टेंबर):- तालुक्यातील दुखःद घटना वीज पडून पती पत्नी जागीच मृत्यू पडले. मुत्यु झालेल्या मध्ये पारडगाव येथील पिंन्टु मोतीराम राऊत वय ३० व पत्नी गुंजन पिंन्टु राऊत हे ब्रह्मपुरी शहरात काही कामानिमित्त गेले असता व आपले काम आटपून गावाकडे परत जात असताना भगवती राईस मिल जवळ त्यांच्या दुचाकीवर विज पडल्याने दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या दोघाना आठ महिण्यांचा छोटासा निरागस बाळ असुन राऊत परीवारांवर व मित्रपरिवाराला मोठें दुःखाचे डोंगर कोसळले आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत.