चंद्रपूर समाचार : तीन महिन्यांत पाच जणांचा जीव घेऊन दहशत माजविणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे

29
फाईल फोटो

👉 चंद्रपूर समाचार : चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या कोलारा परिसरात फरवरी महिन्या पासुन ४ जुन पर्यंत दोन महिला व ३ पुरुषांना वाघाने ठार केले. या वाघाला ठार करण्या करीता वरीष्ठ पातळीवरून आदेश मिळतात. सकाळ पासुन या वाघाना जेरबंद करण्या करीता २६ अधिकारी व कर्मचारी मोहीम राबवित होते. अखेर ५ .०० वाजताच्या दरम्यान चैती वन संरक्षीत क्षेत्रातुन जेरबंद करण्यात यश आले.

👉 जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असुन त्यांना वनक्षेत्र कमी पडत आहे. ज्यामूळे वन्यप्राणी व माणवी संघर्ष वाढलेले आहे. कोलारा परीसरात मागील तिन महिन्या पासुन आज तागायत पाच नागरीकांना ठार केले आहे. मार्च महिन्यात जागली करण्या करीता गेलेल्या कोलारा येथील बालाजी वाघमारे, ८ एप्रिला मोहफुल वेचणाऱ्या सातारा येथील यमूना पांडूरंग गायकवाड, १९ मेला तेंदुपत्ता तोडायला गेलेल्या कोलारा येथील लिलाबाई चंद्रभान जिवतोडे, तिन दिवसापुर्वी ४ जुनला स्वतःच्या शेतात कुंपन करण्या करीता गेलेल्या बामनगाव येथील राज्यपाल दयाराम नागोसे व शेतावर गेलेल्या कोलारा येथील राजेश्वर दडमल असे वाघाच्या हल्यात पाच बळी गेले.

👉 सततच्या वाघाच्या हल्याने परीसरात दहशत निर्माण झाली असुन या वाघाचा तातळीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याप्रमाणे वरीष्ट पातळीवरून या वाघाला जेर बंद करण्याचे आदेश काढण्यात आले. वाघाच्या हालचालीवर ट्रॅप कॅमेरा द्वारे नजर होती त्यावरूण हा टि वन वाघ चैती संरक्षीत वन क्षेत्रात असल्याचा शोध लागला. त्याप्रमाणे त्याला बेहोश करण्या करीता विशेष पथक दबा धरून होते. अखेर त्यांना सांयकाळी ५ .०० वाजता त्यात यश आले. ही मोहीम वरीष्ठ अधिकारी लडकत, खोरे, जाधव, व्याघ्र संरक्षण दलाच्या जाधव, आर. एफ ओ शेन्डे, चव्हाण, आर ओ कोडापे व इतर कर्मचाऱ्यानी फत्ते केली.