केज तालुक्यातील होळ येथे थांबलेल्या प्रवासी मुस्लिम बांधवांना केली मारहाण

33

🔺मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर

✒️नवनाथ पौळ(प्रतिनिधी,केज तालुका)
मो:-8080942185

केज(दि.18सप्टेंबर):- दि १६ रोजी अंबाजोगाई येथील चळवळीतील अभ्यासू नेर्तृत्व हाफिज सिद्दिकी साहेब यांचे दोन दिवसांपुर्वी निधन झाले त्यांच्या मौतीसाठी धारुर येथील मुस्लिम धर्मगुरू व त्यांचे सहकारी बांधव अंबाजोगाईकडे येत असताना होळ येथे त्यांची गाडी खराब झाल्याने थांबले असता तेथील मनुवादी विचारसरणीच्या गावगुंडांनी केवळ मुस्लीम आहेत म्हणून द्वेष करत जबर मारहाण करून जखमी केले व गाडी ची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील होळ या गावात घडली.

सदरील घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण जिल्ह्यात तिव्र पडसाद उमटले आहेत.सदरील घटना ही धार्मिक द्वेशातून जाणुनबुजून घडवलेल्या प्रताप असून पुरोगामी पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडणं म्हणजे शिव ,फुले,शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणं म्हणजे निंदणीय निषेधार्ह आहे व एक प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या मुळावर घाव घातल्यासारखे आहे.
वरील घटनेचा निषेधार्थ व मुस्लीम बांधवांना मारहाण केलेल्या मनुवादी गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज दिनांक १८सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रकरणात लक्ष घालून संबंधित पोलिस स्टेशनला त्वरीत कारवाई चे आदेश देऊन आरोपींची कसलीही गय न करता कारवाईच्या सुचना कराव्यात व पिडीतांना त्यांची नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी या प्रमुख मागणीसह निवेदन देण्यात आले.

सदरील घटना गांभीर्याने न घेऊन अशा घटनांना आळा न घातल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे अंबाजोगाई तालकाध्यक्ष मा.जांबुवंत( संजय) तेलंग, अंबाजोगाई शहरातील वंचितचे नेते अमोलदादा हातांगळे, अॅड.सुभाष जाधव, वंचितचे नेते आदरणीय खाजामियाॅ पठाण,चंद्रकांत सरवदे, पत्रकार नवनाथ पौळ, नितिन सरवदे, अनिल कांबळे,लखन वैद्य, पत्रकार प्रसेनजित आचार्य,अमोल वाघमारे, परमेश्वर सरवदे, अखिल पठाण,अब्राल शेख,आणिक पठाण, निसार पठाण, जमेल शेख, बाबासाहेब विठ्ठलराव मस्के, मारुती सरवदे, देशमुख मोबिन,अक्षय भूंबे, रत्नदिप सरवदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.