युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हिंगोली यांच्या वतीने मा.आदित्य ढाले यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना अन्नधान्य वाटप

20

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.18सप्टेंबर):-युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हिंगोली येथे खटकाळी भागात मा.आदित्य ढाले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

त्यांनी समाज क्षेत्रात कित्येक दिवसापासून गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. व आंदोलने सुद्धा केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन व वाढदिवस साजरा करून गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पावडे, पॅंथर ग्रुप शहराध्यक्ष शुभम थोरात, सतीश सांगळे, राम रगडे, देवा ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.