एक आनंदाचा क्षण

28

आज शुक्रवार , रोजच्या वेळेवर मी माझ्या कामावर निघालो होतो , माझे ऑफिस घरापासुन ३० कि.मी. अंतरावर होते , म्हणुन मला बसचा प्रवास करावा लागत होता. आणि बस मधुन उतरल्यावर सुध्दा मला १ कि.मी पायदळ जावे लागत होते.
आज जरा घरातुन लवकरच निघालो होतो , मला माझ्या एका मित्राकडे वयक्तीक काम निघालं होत.
जेव्हा माझे आप्तजन सोडून गेले होते तेव्हा मला माझ्या मित्रानेचं साथ दिली आणि देत आहे. मित्र हा पुर्णी जन्मातला माझा सारथीचं असावा असे मला कधी कधी भासते.

घरातुन लवकर निघ्याल्या मुळे आज वाटेतल्या साई बाबा मंदिरात जाऊन दर्शन सुध्दा घ्यायचं होत. म्हणुन मी आमचे शेजारी फुलवाले काका यांच्या कडून मी मस्त सुंगधी गेंदा फुलांचा हार घेतला , एक नारळ , आणि आरतीची काही आवश्यक सामग्री. असे साहित्य घेतले व मंदिर कडे दर्शनास गेलो. आज गुरूवार , रविवार नसल्या कारणाने तशी गर्दी फार नव्हती म्हणुन साई बाबाचे दर्शन लवकर झाले.

काही वेळ तिथे बाहेर मंदिच्या पायरीवर बसलो , रोजच्या पेक्षा आज खुप मस्त वाटत होते , रोज कामाची धावपळ , ऑफिस ला कामाचा व्याप , भविष्यात काही तरी “अर्थ” जमा झाला पाहिजे म्हणून मी ऑफिस ला वोव्हर टाईम करावे , घरी थोडं लेट व्हायचं , फ्रेश होणे , घरी आल्यावर घरी स्वंयपाक करने , जेवन करने आणि आपला आराम. सुट्टीचा दिवस असल्यावरही मी कामारच असायचो कारण मला घरी वाट पाहनारे कोणीचं नव्हते . या शहरात मला पुर्ण १० वर्ष झाले होते तरी माझ्यासाठी हे शहर नविनच होते. तसे माझे मित्रही फार कमीचं म्हणून कुठे फिरायला जाण्याचा फारसा छंदही नव्हता. कधीतरीचं सुटी घ्यावी वाटली तर घरी आठवड्याचे माझे कपडे पडलेले असायचे ते धुणे , दिवसभर घरातल्या कामातुम वेळचं भेटत नसे. थोडा फार वेळ मिळालाही तर माझ्या आवडीचे एक पुस्तक वाचायचो.

असे माझं जीवन , दिवसामागे दिवस जात असायचं. कधी कधी खुप एकटं वाटायचं पण माझा मित्र माझ्या सोबतीला आधार द्यायला होता. त्याचे घर माझ्या घरापासुन अगदी ४ कि.मी आहे.काही हव असल्यास नको असल्यास तोचं माझी काळजी घेत होता.
माझ्या परीवार बद्दल सांगायचे झालचं तर….मी बुलढाणा मधल्या एका खेडेगावातल्या जमिनदार घराण्यातला वंश आहे. पण माझे आई वडिल मी जन्मताच सोडून गेले , तेव्हा पासुन त्या घडलेल्या प्रकाराचा मला घरचे जबाबदार समजतात. नंतर कसे तरी त्यांनी १५ वर्ष माझं पालनपोषन केलं , कधी कधी अंधारात झोपायला लावायचे , तर कधी पावसात. शेतातली सर्व कामे करायला लावायचे , सांगायला बरेच काही आहे पण असो. कारण मी माझ्या आई-बाबानां जन्मताच म्रृतूच्या दारात ढकलले होते असे त्यांचे म्हणने. म्हणून ते माझा छळ करत होते. कसा तरी मी वयाच्या १५व्या वर्षी तिथुन पळ काढून या सोलापुर शहरात आलो.

या शहरातला पहिला आणि शेवटचा माझा कोणी असेल तर तो माझा मित्र. तसी घरची परीस्थिती सुध्दा बरीचं आहे , त्यानेचं त्याच्या सोबत माझं शिक्षण सुध्दा जॉब करण्याईतके केले.
माझ्या मित्राने पण माझ्या बद्दल घरी खुप वेळा मार खाल्लेला आहे. कारण आज मी जे काही आहे हे फक्त त्याचे ऋण आहेत. त्याला खर्चाला त्याचे वडिल “पॉकेट मनी” द्यायचे ते पैसे तो मला येऊन द्यायचा. महिण्याचे माझ्याकडे तो ५/६ हजार तरी द्यायचा. येवढ्यात माझी राहण्याची व्यवस्था पण त्यानेचं करुन दिली होती. सुरवातीला त्याने मला एका आजीकडे जेवनाची व्यवस्था केली होती. दोन वर्ष तरी मी तिथेचं काढले. नंतर एक रुम केली तीथे सुध्दा एक दिड वर्ष काढले असेल.
माझ्या मित्राने मला दिलेले दर महिण्याला ५/६ हजार त्यातील माझा खर्च महिण्याचा फार काही नव्हता म्हणून मी त्यातील दर महिण्याचे उरलेल पैसे गोळा करत असो. असेच माझे दिवसा मागे दिवस जाऊ लागले , काळ बदलत होता. गेल्या एका वर्षाच्या आधी मी माझ्या मित्राला सांगीतले “तू मला ८ वर्षा पासुन जे पैसे देत आहेस त्यातील काही पैसे मी बचत केली आहे तू हे परत घे”
तर त्याने मला विचारले “तुझ्याकडे किती पैसे जमा झाले आहेत?

मी पैसे मोजण्यास सुरवात केली तर ते पैसे “तिन लाख चौरेचाळीस हजार नऊशे रुपये” येवढे जमा झालेले होते. मी या आधी कधीचं ते पैसे मोजले नव्हते.
त्याला सुध्दा आचर्याचा धक्काचं बसला. का बरे बसनार नाही… कधीचं मी त्याला ही गोष्ट सांगीतलेली नव्हती. आणि आज अचानक त्याच्या समोर मी एकदमचं येवढे पैसे ठेवले…हे पैसे माझं शिक्षण , जेवणाचा खर्च व रुम भाडे काढून काढलेले उरले होते.
त्याने एक योजना आखली व त्याच्या पप्पाच्या मित्राकडे गेला आणि माझ्याकरीता एक फ्लॉट घेतला. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू मावेना झाले होते.
*कोणी करते का येवढे कोणासाठी?*
पण आज माझ्या या मित्राने माझ्या आई – बापा प्रमाणे माझ्या सर्व गरजा स्विकारल्या. माझा रक्ताचा भाऊच असावा….”छे छे…रक्ताची नाते कधीचं कामात येत नाही” हा तर माझ्यासाठीच देवाने पाठवलेला देवदुत असावा.
असा माझा मित्र.

आज मला त्याच्या कडे जायचे होते , म्हणून मी लवकर निघालो , दर्शन घेतले व थोडा वेळ मंदिराच्या पायरीवर बसलो होतो. तर तिथे एक सुंदर , सुशील, मुलगी आली. जनु अप्सराचं असावी माझ्याकरीता…
ती मुलगी पायऱ्या चढून दमुन गेली होती म्हणून माझ्याचं बाजुला येऊन बसली होती. मी पण हिंम्मत करुन तिला तिचे नाव विचारले , तर तिचे नाव सुध्दा तिच्याप्रमाणेचं गोड होते. तिचे नाव “आरती” मी माझे नाव सुध्दा तिला सांगीतले “माझे नाव प्रणव” आमची ओळख झाली.
मलाही ती मुलगी फार आवडली होती. म्हणून मी तिला रोज मंदिरात येतो म्हणून सांगीतले.
पण तिने मला प्रश्न विचारला तुम्ही रझ मला इथे दिसत नाही. मी आपली काहीतरीचं थाप मारली आणि सांगीतले की मी इथं रोज येतो पण माझी काही ठरावीक वेळ नाही. थोडासा अप्लपरीचय करुन घेतला , त्या मुलीला लहान असतांनाच पोलिओ झाला आसल्यामुळे पायात थोडी लचक होती. तिने सर्व सांगीतले , आमचा परीचय वाढत गेला. मला तिच्या बद्दलचे भावणा मनात वाढू लागल्या होत्या. मला तिच्यावर प्रेम झाले होते आणि हा प्रकार मी माझ्या मित्राला सांगीतला , त्याने विलंब न करता त्याच्या पप्पाला माझ्याबद्दल आज सर्व सांगुन टाकले होते. त्याच्या पप्पाला या सर्व गोष्टीचा खुप आनंद गगणात मावेनासा झाला होता. पप्पाने मला भेटायला बोलावले व मला सर्व सांगीतले आणि त्यांचा एक नाही दोन मुलं आहेत म्हणुन मला स्विकारले. त्या मुलीच्या घरी जाऊन माझ्या लग्नाचा विषय काढला आणि माझे लग्न लाऊन दिले. मला अपेक्षा नव्हती की येवढ्या लवकर देव मला सर्व काही परत देईल .
माझ्या मित्राच्या खांद्यावर डोके ठेऊन मी ठसाठसा रडलो. माझे मन खुप हलके झाले होते.

मी आज खुप खुप आनंदी आहे माझ्या मित्रामुळे. माझा मित्र माझं सर्वस्व आहे , माझा बाप , आई , भाऊ , सखा , सारथी आणि एक मार्गदर्शक.
या गोष्टीचा मला गर्व आहे.
आणि आज च्याच्या मुळेच मी कदाचीत जिवंतही आहे.

आज कालच्या या स्वर्थी जगात चांगला मित्र मिळने तेवढेच कठीण आहे जेव्हढे की समुद्रातुन पारीस मिळणे. असा मित्र माझ्या आयुष्यात मिळाला माझे नशिबचं आहे!

✒️कवि/लेखक:-शब्दशृंगार(तू फक्त माझीच)
मो.नं. 9307829542
विशाल पाटील ,वेरुळकर
शेगाव , जिल्हा बुलढाणा.ह.मु.अंजनगाव सुर्जी.जिल्हा.अमरावती

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620