कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन

  39

  ✒️शेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  शेगाव(दि.18सप्टेंबर):-तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे वतीने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी कांदा निर्यात बंदीच्या मोदी- भाजपा केंद्र विरोधात मा. महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद ह्यांना तहसीलदारां मार्फत निवेदन देण्यात आले. कोरोना काळात जगभर लाॅकडाॅउन असतांना मोठया कष्टाने व विपरीत परिस्थीतीत शेतक-यांनी कांदयाचे उत्पादन घेतले.

  या काळात बाजारात कांदा विकणे शक्य नसल्याने त्याची घरीच साठवण केली. आता बाजारात कांदयाला चांगले भाव येवू लागल्याने व साठविलेला कांदा सडण्याची शक्यता पाहता बाजारात शेतक-यांनी विक्रीस आणला. कधी नव्हे ते चार पैसे हातात पडतील अशी शेतक-यांना निर्माण झाली असतांना मोदी सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवुन शेतक-यांवर अन्याय केला आहे.

  यापूर्वी 4 जुन 2020 रोजी केंद्रीय मंत्री ना.प्रकाश जावडेकर यांनी कांदा जीवनावश्यक वस्तुच्या यादीतुन वगळण्याची घोषणा केली होती. परंतु तीनच महिन्यात घुमजाव करीत निर्णय बदलल्यात आला व निर्यात बंदी लागु झाली. हा सरळ- सरळ शेतक-यांवर अन्याय असुन केंद्र सरकारने शेतक-यांना न्याय देण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

  या मागणीसाठी तालुका काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आले व अन्याय कारक निर्णय घेणा-या सरकारचा निषेध नोंदविण्यात येत आला. ह्या प्रसंगी तालुकाध्यक्ष विजय जी काटोले, शहराध्यक्ष दीपक सेठ सलामपुरिया, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक केशवराव हिंगणे, S.C. आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गवई, तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष अनिल सावळे, युवा नेते विजय वानखडे, तालुका काँग्रेस कमिटी सचिव ज्ञानेश्वर शेजोले, शहर सरचिटणीस दिलीप पटोकार, माजी सरपंच गोपाल उजैनकर,उपसरपंच शिवाजी माळी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख अमीन जमदार, धनराज खोंड, S.C. आघाडी शहराध्यक्ष भिकुभाऊ सारवान, नितेश कंकाळे, धरम सारवान, ईश्र्वर सारवान, खान सुरे खान, ह्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी शेतकरी बांधव उपस्थित होते.