हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री.हेमंतभाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

12

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यांमध्ये covid-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. या रुग्णांचा throat स्कॅब तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात येत होता. यामध्ये मोठा कालापव्यय होत होता. परिणामी विलगीकरण कक्षातील संख्या वाढत होती.

या बाबींचा विचार करून हिंगोली येथेच RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्यासंदर्भात हिंगोली लोकसभेचे कार्यतत्पर खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार केला होता. सदर प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून हिंगोली येथे RT-PCR प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.