महाराष्ट्र राज्य सरकारने केले शाळा प्रवेशाचे वयात पुन्हा बदल

15

🔸आता साडेपाच वर्षाचा बालक इयत्ता पहिलीत

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)मो:-8698648634

चंद्रपूर(दि.19सप्टेंबर):- कोरोणाच्या महामारित सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अश्य कोरोना वादळाच्या काळात शिक्षणावर खूप मोठा परिणाम होत आहे. कोरोणा मुळे संपूर्ण शाळा बंद आहेत. शाळा सुरू करणे राज्य सरकारच्या समोर मोठे आव्हानच आहे. अश्यात महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक धोरणातही खूप मोठा बदल केला आहे. हा नवीन शैक्षणिक धोरण 2020 ला 34 वर्षानंतर मंजुरी मिळाली आहे.

या नवीन नवीन शैक्षणिक धोरणातही शुक्रवार ला अजून काही बदल केले आहेत. राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. 2021-22 च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. ज्या मुलांच्या वयास 31 डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. ज्या मुलांच्या वयास 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू केला आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण 5+3+3+4 सूत्रांच्या अंतर्गत शिकविले जाईल. यामध्ये 5 वर्षे मूलभूत, 3 वर्षाची प्रारंभिक शाळा, 3 वर्षाची माध्यमिक शाळा, 4 वर्ष उच्च माध्यमिक शाळा, असे असतील. यामध्ये बोर्डाचे पेपर फक्त 12 वी च्या वर्गाला असणार आहे. तर महाविद्यालयीन पदवी 4 वर्षाची असणार आहे. प्राथमिक कौशल्ये विकसित होण्यापूर्वी लेखन, वाचन असा अभ्यासाचा भार साडेपाच वर्षांच्या मुलांना सोसावा लागणार आहे.