मराठा समाजाच्या आरक्षणचा प्रश्न सोडवा पण ओबीसीमध्ये घुसखोरी नको – दत्ता वाकसे

30

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.19सप्टेंबर):-गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामध्येच कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन हे महाराष्ट्रभर होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या आणि भटक्या-विमुक्त समाजाचे आरक्षण बेकायदेशीर आहे असं मराठा समाजाचे नेते बोलायला लागले आहेत महाराष्ट्रातील जातीय सलोखा कायम राहायला पाहिजे नाही तर संघर्ष अटळ आहे.

असा इशारा देत धनगर समाज संघर्ष समितीचे निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आमचं आरक्षण बेकायदेशीर ठरवायचं हे योग्य नाही मराठा नेते आता प्रक्षोभक भाषण करत आहेत ओबीसी आणि भटके-विमुक्त समाज हे मान्य करणार नाही मराठा आरक्षण हे घटनापीठाकडे गेले आहे ते किती वर्षे चालेल हे माहिती नाही तोपर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणून आरक्षण द्यावं त्यामुळे गरीब मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक दृष्ट्या त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याचादेखील महाराष्ट्र सरकारने विचार करून गरीब वंचित मराठा समाजातील युवकांना शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण द्यावे असेदेखील त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजावर गेल्या 70 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे त्यामुळे आता मराठा समाजाची यामध्ये घुसखोरी होता कामा नये मराठा आरक्षणाला आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही ,त्यांना त्यांचे स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसींना विनाकारण त्रास होईल त्यामुळे ओबीसी’मध्ये कसले प्रकारची घुसखोरी न करता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे असेदेखील वाकसे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.