✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.19सप्टेंबर):- येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे निरीक्षक सन्माननीय मा. नितीन अण्णा शिवशरण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन पुणे शहर काँग्रेस अनुसूचित जाती चे अध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी केले होते.

या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, राज्या समन्वयक उपस्थित होते. बैठकीमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये कोरणा काळामध्ये केलेल्या कामाचा आढावा मा.नितीन अण्णा शिवशरण यांनी घेतला.

या वेळी पुढील दोन ते तीन महिन्या मध्ये अनुसूचित जाती विभागाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जाती विभागाचा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुजित यादव, राजाराम बल्लाळ, कविराज सांगोलीया, सोलापूर जिल्हाध्यक्ष गौरव खरात सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. सुशील घाटपगार, राज्य समन्वयक विजयकुमार भोसले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, व पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते पदाधिकारी उपस्थित होते….

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED