🔹महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सर्व तमाम पत्रकारांचे आभार

🔸पुन्हा एकदा दिसली पत्रकारांची भक्कम एकजूट

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.19सप्टेंबर):-पत्रकारांच्या राज्यव्यापी आंदोलनास आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना राज्यभरातून हजारो एसएमएस पाठविले गेले आणि जोरदार पाऊस असताना देखील राज्यातील जवळपास शेकडो तालुक्यातून व तीस जिल्यातून हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना सुरू करावी, कोरोनानं आजारी पत्रकारांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची तात्काळ व्यवस्था व्हावी आणि पत्रकार संतोष पवार आणि पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाई व्हावी,यासंदर्भात आज राज्यभर आंदोलन केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना जिल्हा जिल्हयातून हजारो एसएमएस पाठवून पत्रकारांनी आपल्या तीव़ भावना व्यक्त केल्या.. “आम्ही कोरोना यौध्दे आहोत ना? मग आमची काळजी घ्या, दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख आणि पत्रकार विमा योजना तात्काळ सुरू करा” अशी विनंती एसएमएस पाठवून करण्यात आली.

सर्वत्र पाऊस कोसळत असताना देखील पत्रकारांनी तोंडाला काळे मास्क लावून निषेध व्यक्त केला.असंख्य पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून आपल्या भावना कळविल्या..
वरील सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील पत्रकारांच्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव सरकारला झाली असेल आणि त्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांची लगेच पुर्तता होईल अशी अपेक्षा आहे.

अत्यंत अल्प काळात आवाहन केल्यानंतरही राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व सर्व राज्य कार्यकारिणीच्यावतीने राज्यातील तमाम पत्रकार बांधवांचे आभार मानले आहेत.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED