बीडकरांचे प्रेम स्मरणात ठेवणार – पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

28

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.19सप्टेंबर):- जिल्ह्यात काम करतांना कमी कालावधीत अनेक आव्हानात्मक कामे करता आली. पोलीस दलात काम करतांना खाकी हाच धर्म असतो. हा धर्म मी पहिल्यापासून जोपासला. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता आली.

हे करत असतांना बीड जिल्ह्यातील जनतेने पोलीस प्रशासनाला दिलेले प्रेम माझ्या कायम स्मरणात राहील. पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावतांना सर्वांना समान न्याय दिला. हा जवळचा तो दुरचा असा भेदभाव कधीही केला नाही. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्णय घेतले. राजकीय दबाव असला तरी लोकांचे हित जोपासण्याची भुमिका कायम जोपासली अशा शब्दात बीडचे मावळते पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बीडचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून दोन दिवसापूर्वी राजा रामास्वामी यांची नियुक्ती झाली आहे तर हर्ष पोद्दार यांची बदली झाली आहे. बीडकरांचा निरोप घेण्यासाठी शनिवारी दुपारी पोद्दार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अप्पर अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.

बीडमधील 14 महिन्याच्या कालावधीत केलेल्या कामाचा उल्लेख करतांनाच या कार्यकाळात जिल्ह्याचा पोलीस दल प्रमुख म्हणून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल पोद्दार यांनी क्षमा ही मागितली.