नागभीड मधील सेवाभावी संस्थांची मदत पोचली पूरग्रस्त भागात

5

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.20सप्टेंबर):-दिनांक 30 व 31 आगस्ट ला गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 3 ते 4 मीटर ने उघडल्याने आलेल्या पुरात ब्रम्हपुरी तालुक्यातील 28 गावांना या पुराचा फटका बसला.. या पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने अनेक गावे पूर्णता पाण्याखाली आली जवळपास 15 ते 20 फूट पाण्यात सर्व शेती,घरे पाण्याखाली आल्याने अतोनात नुकसान झाले यात अनेकांची घरे पडली,शेती पूर्णता पाण्यात बुडाली तर घरात साठवलेले अन्नधान्य पूर्णता सडून गेले,तर कपडे वाहत गेले त्यामुळे होत्याचे नव्हते झाले..प्रशासनाची वेळीच मदत पोचल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरवले अश्या या परिस्थिती मध्ये नागभीड येथील सांस्कृतिक,शैक्षणिक,पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या झेप निसर्ग मित्र संस्था, आपुलकी फाऊंडेशन ,स्वामी विवेकानंद पतसंस्था,स्व.प्रसाद राऊत ट्रस्ट,स्वप्नपूर्ती बहु.संस्था यांनी पुढाकार घेऊन गावातील स्थानिक प्रतिष्ठित व्यापारी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने मदतीचा हात देण्याचे कार्य हाती घेतले… त्यानुसार कपडे तसेच अन्नधान्य यांच्या किट तयार करण्यात आल्या..

त्यामध्येचादर,ब्लँकेट,शर्ट,पॅन्ट,साडी,लुगडा,धोतर,तांदूळ,तेल,पीठ,डाळ,तिखट,साबण,चना,नीरमा,मीठ या सारख्या सर्व जीवनावश्यक वस्तूची किट तयार करून उदापुर,रनमोचन या ठिकाणी जि.प.सदस्य संजयजी गजपुरे,बाळूभाऊ नंदूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गरजू कुटुंबाला वितरण करण्यात आले.
यावेळी झेप निसर्ग मित्र संस्थेचे डॉ.पवन नागरे,आपुलकी फाऊंडेशन चे अध्यक्ष विजय बंडावार,संचालिका माया सहारे, स्व.प्रसाद राऊत ट्रस्ट चे ओम मेश्राम,स्वप्नपूर्ती संस्थेचे सतीश मेश्राम,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक मनोज कोहाट यांची उपस्थिती होती..!!

सदर मदत पुरग्रस्थापर्यंत पोहचवण्यासाठी अमित देशमुख, अमोल वानखेडे,पराग भानारकर,जितेंद्र श्यामकुळे,आकाश लोनबैले,क्षितिज गरमडे,गुलाब राऊत,करण मूलमुले,तुषार गजभे,आशिष कुंभरे, विरु गजभे यांनी अथक परिश्रम घेतले..!!!