पोटार्थी आणि मतीमंदांची कोल्हेकुई…!!

34

समाजाशी दुरान्वयानेही कुठलाच संबंध न ठेवणारे परंतु आपलं पोट कसं भरायचं .?? याचाच सतत विचार करणारे काही शुद्र जीव प्रत्येक समाजात कालही होते, आजही आहेत आणि ऊद्याही राहतील…!!
ही एक माणूस नावाच्या जातीतील विकृती आहे असे म्हणायला काहीच हरकत नसावी, कारणं माणुस नावाच्या प्राण्यानेच माणुसकी जन्माला घातली, वैचारिक दृष्टी विकशीत केली, सृष्टीतील इतर कुठल्याही प्राण्याला ती साधता आली नाही…!!
ही स्वार्थी जमात मात्र पोटाच्या पुढे सरकायला तयार नाही…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, महार समाजातील गुलामी,लाचारी, आणि नरकमय जगणं घालवून स्वाभिमानी,स्वयंसिद्ध जीवन जगणारा समाज घडविण्यासाठी “महार वतनाची” जमीन खालसा करण्यासाठी मुंबई विधिमंडळात बिल मांडले तेव्हा महारातीलच पोटार्थी महार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभे राहिले होते त्यांच्या मतें महारकी गेली तर आम्ही जगायचे कसे…??
त्यावेळी विरोध करणाऱ्या महारांचा ऊद्देश लक्षात घेतला तर हेचं जाणवते की,त्यांना समाजाचे काही देणेघेणे नव्हते तर फक्त आपल्या पोटाचाच ते शुल्लक विचार करीत होते, आणि दुसरं म्हणजे त्यांची वैचारिक झेप ही अतिशय कमी वा नसल्यागत असल्यामुळे साधारणपणे ज्याला आपण “मतीमंद” म्हणु अशाप्रकारची असल्यामुळे त्यांना भविष्यात डोकावता येतं नव्हते. सबब ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा विरोध करीत होते…!!

आजही तीच विकृत जमात जीवंत आहे आणि आपल्या पोटासाठी धडपड करतांना दिसत आहे,…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात शिक्षण नव्हते म्हणून विरोधकांना कुणी सिरीयसली घेतलं नाही मात्र आता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊनच जगायच परंतु आंबेडकरी विचारधारेचा विरोध करायचा असा निलाजरा व्यवहार सुद्धा काही “मतीमंद” राजरोसपणे करीत आहेत…!!
विरोध करतांना ते त्यांच्या पत्रकार, संपादन किंवा विचारवंत अशा मालिकांनी बहाल केलेल्या लाचार पदव्यांचा वापर करून भोळ्या भाबड्या समाज बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत…!!
वैचारिक पातळी सोडून परंतु युक्तिवाद केल्यागत मुद्दे मांडणाराला विचारवंत म्हणावे का.??
शिक्षण आहे मात्र त्याला शीलाची जोड नाही अशा बेधुंद शिक्षितांना विद्वान समजावे का.??
“आचाराविना विचार वाया” वामन दादांची ही शिकवणं तुम्हाला समजली का.??
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तीपुजेला थारा दिला नाही…!!

मात्र ही विकृतांची टोळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मालकांच्या सांगण्यावरुन आंबेडकरी समुहात भेदभाव निर्माण होईल अशी भाषा वापरत सुटले आहेत…!!
पुतळा महत्वाचा की, जागतिक किर्तीचे संशोधनं केंद्र महत्त्वाचे यातील फरक ज्यांना कळतं नाही त्यांना “मतीमंद” संबोधणे गैर होईल का..??
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्यात बंदिस्त करायचे की, विचारधारा बनवून जगभर घेऊन जायचे…!!
भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वाधिक पुतळे आहेत हाही एक इतिहास आहे तरीही पुतळ्याचाच अट्टाहास कशासाठी…???
आजही देशातील अनेक राज्यांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य पुतळे उभारले जात आहेत,उदा, आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री महोदयांनी हैदराबाद मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आता एवढ्यातच ऊभारला आहे…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे केवळ भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड आस्ट्रेलिया जर्मन जपान चीन रशिया आणि एकुणच जगभरातील विद्यापिठात उभे राहिले आहेत हेही लक्षात घ्यावे…!!

मात्र देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जागतिक किर्तीचे स्काॅलर संशोधन केंद्र आहे का…??
ऊत्तर नाही असेच आहे, संशोधन केंद्र आणि तेही जागतिक दर्जाचे अर्थात जगातील विद्यार्थी अभ्यास करतील आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगभर घेऊन जातील.असे संशोधन केंद्र त्यातील विषय हे परराष्ट्र धोरण,आर्थिक धोरण,नव्या समस्यांशी सामना करण्यासाठी संशोधन आणि जगाच्या तुलनेत भव्यदिव्य कार्याची व्याप्ती असलेलं केंद्र ऊभे करण्याच्या कामाला तुमचा विरोध का.??
कशासाठी..??
शिक्षण असुनही अज्ञानी बौद्धिक व्यवहार का करता..??
याचे उत्तर सरळ आणि सोपे आहे की, पोटार्थी आणि मतीमंदांची ही कोल्हेकुई आहे…!!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर सर ( राजकीय विश्लेषक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो:-9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका विशेष प्रतिनिधी)
मो:-8080942185