मराठा आरक्षणावर जाणते मराठे बोलतं का नाहीत…??

13

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांनी तयार केलेले सरंजामदार, इनामदार आणि जागिरदार संपवले आणि रयतेच्या हितास्तव जनहिताचे कायदे केले,पटवारी कुलकर्णी नेमले आणि जनतेची लूट थांबविली…!!
छत्रपती शिवाजीराजे यांना समाजहित अभिप्रेत होतं.म्हणून सतराव्या शतकात शिवबांनी सरंजामदार इनामदार आणि जागिरदार थांबविले मात्र सांसदीय लोकशाहीच्या आडून महाराष्ट्रात घराणेशाही पोसणारे सरंजामदार इनामदार आणि जागिरदार नव्याने तयार झाले आहेत…!!

आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी याचं मोगलाई मराठयांनी गरीब मराठा बांधवांचे शोषण केले आहे परिणामी सुबत्ता असलेला मराठा समाज आज आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे…!!
सहकाराच्या नावांवर सुरु केलेलें सहकारी साखर कारखाने अवसायनात कसे गेले..??
त्याचवेळी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले हे कसे..??
जो सहकारी साखर कारखाना सहकारात होता तेव्हा तोट्यात आणि खाजगी झाला की, नफ्यात कसा चालतो…??

साखर कारखाना अवसायनात गेला तर शेअर्स घेणा-या गरीब शेतकऱ्यांची नुकसानभरपाई दिली जाते का..??
साखर कारखान्यांसाठी लागणारा ऊस उत्पादक शेतकरी हा गरीब मराठा आहे,त्याचे शोषण कुणी केले.??
ऊसाच्या भावासाठी आंदोलन का करावे लागते,..??
उसाचे गाळप सुरू होऊनही दोन दोन महिने उसाचे पैसे का मिळतं नाहीत…??
कित्येकदा शेतातच ऊस जाळण्याची पाळी कुणी आणली…??
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मोघलाई मराठ्यांची स्वार्थीवृत्ती उघडं करणारी आहेत…!!
१९८५-८६ मध्ये वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी माणगांव ते पुणे असा लॉंगमार्च काढला होता आणि साखर कारखान्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता, तेव्हा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते सहकार क्षेत्रातील एकुण ८० कारखानदारांनी बाळासाहेब आंबेडकर यांना नोटिशी पाठविल्या होत्या मात्र ते कोर्टात जाऊ शकले नाही,कारण बाळासाहेब आंबेडकरांनी एकच प्रश्न उपस्थित केला होता की,…!!

साडेतीन एकर शेतीचा मालक १५० कोटीचा मालक कसा झाला त्याचा हिशोब मी मागणारं आहे,सगळे चुप झाले…!!
सहकारी क्षेत्रातील सर्वचजण नातेवाईक आहेत आणि तेच सर्वजण महाराष्ट्रातील राजकीय धुरीण आहेत,तेच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहेत…!!
या मोगलाई मराठयांनी आपल्या साखर कारखान्याच्या बाजूला उभे राहणारे छोटे छोटे तीस पस्तीस प्रकारचे कारखाने ऊभे का होऊ दिले नाही ..?? किंवा उभे का केले नाही…??
असा प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी विचारला आहे,त्याचे कारण असे की,या मोगलाई मराठयांना आपल्याला प्रतिस्पर्धी तयारच होऊ द्यायचा नाही म्हणून ते इतर गरीब मराठ्यांसाठी कुठलाच प्रयोग वा अजेंडा राबवित नाहीत या ऊलट जातीचा दाखला देऊन देऊन मतें मात्र ओरपत राहतात आणि सत्तेवर ठाण मांडून बसले आहेत…!!

मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळतो आहे,प्रत्येकजण आपापल्या परीने व्यक्त होत आहे…!!
ज्यांनी जीव ओतून काम केले ते चुकांची जाणीव करून देऊन मोगलाई मराठयांना दोष देतं आहेत,तर ज्यांना या धुर्त मराठा नेतृत्वाचा जवळून आणि चांगला अनुभव आहे असे पोटतिडकीने समाजहितास्तव झटणारे श्रीमंत मराठ्यांनांच मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही असा अभिप्राय नोंदवीत आहेत…!!
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सुद्धा आता बोलू लागले आहेत की, श्रीमंत मराठयांनी गरीब मराठ्यांचे शोषण केले आहे आणि मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी मराठ्यांनी तसदी घेतली नाही…!!
एवढ्या सगळ्या गदारोळातही जाणते मराठे मात्र मौन धारण करून आहेत…??
असे का बरे…??
जाणत्यांना आपल्या कर्तृत्वाचा हिसेब द्यावा असे वाटतं नाही का..??
अशावेळी जाणत्यांचे मौन म्हणजे काय समजायचे…??
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ मार्गदर्शक विचारवंत अकोला जिल्हा )
मो-9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका विशेष प्रतिनिधी)
मो-8080942185