✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.20सप्टेंबर):-जिल्ह्यात आजही कोरोनाचा आकडा दीडशेपार आहे. आज प्रशासनाकडे प्राप्त अहवालापैकी 159 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.

जिल्हा प्रशासनाने आज एकूण 1 हजार 79 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 920 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अंबाजोगाई तालुक्यात 23, आष्टी 10, बीड 43, धारूर 11, गेवराई 8, केज 19, माजलगाव 16, परळी 18, पाटोदा 3, शिरुर कासार 3, वडवणी 6 असे एकूण 159 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. आता कोरोनाचा एकूण आकडा 8 हजार पार गेला असून कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा देखील सरासरी दीडशे ते दोनशेच्या घरात आहे.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, बीड, महाराष्ट्र, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED