दारोडा येथील शेतकरी गेला पुरात वाहून महसूल व पोलीस विभागाने शोधून काढला मृतदेह

9

✒️ईकबाल पहेलवान(विशेष प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि२० सप्टेंबर):-तालुक्यातील वडनेर परिसरात १८ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या मूसळधार पावसामुळे नाल्याला पुर आला, यात दारोडा येथील शेतकरी बाळकृष्ण रामाजी काकडे वय ६२ वर्ष हे आपल्या म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन गेले असता पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून काल त्यांचा मृतदेह आढळल्याने शोककळा पसरली.

मृतक शेतकरी बाळकृष्ण हे त्यांच्या शेतातील गड़ी आला नसल्याने आपली गुरेढोरे चारावयास शेतात गेले.सायंकाळ होऊनसुद्धा घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा शोध घेण्यास गेला,परंतु त्यांनचे पत्ता लागला नाही,नाल्याला पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वाहून गेल्याची चर्चा गावात होऊ लागली याची माहिती मिळतात महसूल विभाग व पोलिस यांनी शोध मोहीम सुरु केली.

परंतु दि १८ च्या सायंकाळ पर्यंत त्यांना मृतदेह शोधण्यात अपयश आले होते परंतु त्यांनी दि १९ तारखेला पुन्हा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू केले असता काल दि१९ सप्टेंबर रोजी दुपारी ५.३० वाजण्याच्या दरम्यान टेंभा शिवारात वणा नदीच्या पात्रामध्ये त्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला.मृतकाचे कुटुंबात एकत्रीत १० एकर शेती असून पत्नी मुलगा सून नातवंड असा आप्तपरिवार आहे.