मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व नौकर भरती बंद करावी – सुनिल ठोसर

9

🔹गेवराई तहसील प्रशासनाला निवेदन

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.20सप्टेंबर):- मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण काही कारणास्तव स्थगित करण्यात आले आहे.त्यामुळे मराठा समाजावर एक प्रकारे अन्याय झाला आहे.केंद्र व राज्य सरकाराने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास संपूर्ण राज्यात तिव्र अंदोलन छेडण्यात येईल.तसेच जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत राज्य व केंद्र सरकारने कसल्याही प्रकारकारची व कोणत्याही शासकीय कार्यालयातील नौकर भरती करु नये,अशी भरती सध्या केल्यास मराठा समाजातील बेरोजगार तरुण या नौकरी दरम्यान वंचित राहुन आमच्या समाजातील लोकावर एक प्रकारे अन्यायाच होणार आहे.

यासाठी मराठा समाजातील बांधवानी अशा प्रकारे या मागणीसाठी बीड जिल्ह्यात व राज्यात जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्व क्षेत्रातील नौकर भरती बंद करावी अशी मागणी बीड जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष तथा मराठा समाजाचे कार्यकर्ते सुनिल ठोसर यांनी गुरुवारी गेवराई तहसील कार्यालयाला निवेदन देऊन रितसर मागणी केली आहे.सध्याची पोलिस भरती राज्य सरकारने केली तर या भरतीत मराठा समाजातील युवक वंचित राहणार असुन शासनाने ही पोलिस भरती तत्काळ बंद करण्याचे आदेश काढावे अशी देखील मागणी सुनिल ठोसर यांनी यावेळी केली आहे.
मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वाधिक समाज आहे इतर समाजाला आरक्षण किती आहे व यापुढे किती द्यायचे हा आधिकार सरकारला माञ आम्हला आरक्षण मिळावे हि मागणी अनेक वर्षांपासून आमची आहे.

चार दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण बाबत सरकारने स्थगिती दिली आहे.तर दुसरीकडे राज्य सरकारने राज्यात जम्बो पोलिस भरती करण्याचे संकेत दिले आहेत.आरक्षण स्थगित झाल्यामुळे मराठा समाजातील बेरोजगार तरुण या पोलिस भरती पासून वंचित राहण्याचे संकेत दिसून येत आहे.त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत महाराष्ट्र राज्यातील कोणताही शासकीय कार्यालयातील नौकर भरती करु नये.अशी भरती केल्यास मराठा समाजातील बेरोजगार तरुण या सुवर्ण संधीपासून निश्चित वंचित राहणार आहेत.त्यामुळे सरकार जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत या सरकारने कोणत्याही शासकीय कार्यालयातील नौकर भरती करु नये यासाठी मराठा समाजातील बांधवानी अशा प्रकारे शासनाला शासनाला निवेदन देऊन यापुडे जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणतीही शासकीय नौकर भरती करु नये यासाठी अंदोलन करावे असे देखील अवाहन सुनिल ठोसर यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,आरक्षण न मिळाल्यास राज्यभरात तिव्र अंदोलन छेडण्यात येईल,तसेच जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो महाराष्ट्र राज्यात कोणत्याही शासकीय कार्यालयातील राज्य सरकारने भरती करु नये असे केल्यास राजकीय नेत्यांना आम्ही मराठा समाज पळता भुई करु व मराठा समाजातील आमदाराच्या घरासमोर अंदोलन करुन आपन मराठा समाजाला आरक्षण मिळत का नाही असा प्रश्न उपस्थित केला जाईल असा खणखणीत इशारा देखील सुनिल ठोसर यांनी यावेळी दिला आहे.दरम्यान याबाबत शासनाने राज्यातील मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत सर्वच क्षेञातील नौकर भरती बंद करावी अशी मागणी गुरुवारी रयत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल ठोसर यांनी तहसील प्रशासनाला दिले निवेदन देऊन केली आहे.

यावेळी ॲड.सुभाष निकम,कृष्णा मोटे,मधुकर तौर,डाॅ.काळे,बाबूराव भोईटे आदि सह मराठा बांधव यांनी सोशल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करत हे निवेदन प्रभारी तहसीलदार प्रशांत जाधवर व पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांना देऊन केली आहे.