अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाचे तातडीने पंचनामे करा -दत्ता वाकसे

32

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.20सप्टेंबर):- गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे त्यामुळे अतिदृष्टीत जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या शेती पिकाचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये व विशेषता वडवणी तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झालेली आहे.

त्याचबरोबर कापसाचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे परंतु शासनाने अद्याप पंचनामे करण्यास सुरुवात केली नाही याबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असताना प्रशासनाने मात्र याकडे कानाडोळा केला आहे वडवणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड व मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक ओढे नाले पूर पूर आलेला आहे अनेकांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याचा अनेक शेतकऱ्याचे शेती साहित्य पिके वाहून गेली आहेत एकीकडे लोकडाऊनमुळे शेतीमालाला बाजार भाव मिळत नाही.

त्यातच प्रचंड पाऊस पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील त्या दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात वाकसे यांनी दिला आहे

                         ▪️चौकट▪️
🔹अन्यथा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सडलेल्या कापसाच्या बोंडांनी सत्कार करणार

गेल्या काही दिवसापासून बीड बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे परंतु शासन-प्रशासन कुठलीही हालचाल करताना दिसत नाही शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे याबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना सुद्धा याकडे मात्र तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारी हे जाणून बुजून टाळाटाळ करत आहेत त्यामुळे तात्काळ पंचनामे केले नाही तर कापसाच्या सडलेल्या बोंडाच्या हाराचे तोरण घालून अधिकाऱ्यांचा सत्कार करणार आहे असे वाकसे यांनी देखील त्यांनी म्हटले आहे..!