नायगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस सुरुवात

26

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.२०सप्टेंबर):- पासून केज तालुक्यातील नायगाव येथे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस राज्यभरात सुरवात झाली आहे.सध्या राज्यात कोविड 19या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच ग्रामीण भागात देखील वाढ झपाट्याने होत आहे यायचं एक भाग म्हणून नायगाव येथे सरपंच विवेक खोडसे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यामध्ये आरोग्य विभागाकडून गावातील प्रत्येक नागरिकांची थर्मल गण द्वारे तपासणी व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात येणार आहे.तरी आरोग्य विभागाला तपासणी दरम्यान सहकार्य करावे असे आवाहन सरपंच विवेक खोडसे यांनी केले.यावेळी आशास्वयंसेविका संध्या मुजमुले व स्वयंसेवक म्हणून ग्रा. प.कर्मचारी हमीद शेख व गावातील नागरिक उपस्थित होते.