एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद

15

🔹दि.21 ते 24 सप्टेंबर 2020 या दरम्यान आयोजन

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.20सप्टेंबर):-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे सोमवार, दि.21 ते गुरूवार दि. 24 सप्टेंबर 20 या कालावधीत चार दिवसीय ऑनलाईन, “ दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद” आयोजित करण्यात आली आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि. 21 सप्टेबर 2020 रोजी सकाळी 11. 00 वा. होणार आहे. या समारंभासाठी द हिंदू पब्लिसिंग ग्रूपचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण डॉ. एन.राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहातील. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबधांचे माजी प्रा. पद्मश्री डॉ. पुष्पेष पंथ, टिव्ही ब्रॉड कास्टरचे संपादक आणि राजकीय विश्लेषक पद्मश्री आलोक मेहता, राजकीय विश्लेषक संजय बारू आणि नई दुनिया चे माजी प्रमुख संपादक श्रवण गर्ग हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच, परिषदेचा समारोप संमारंभ गुरूवार दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वा. होणार आहे. अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सुप्रसिद्ध लेखक श्री.तथागत रॉय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार श्री.आशितोष, लोकसभेचे खासदार भत्रीहरी महताब, विवेकांनद इंटरनेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तुघलकचे संपादक स्वामिनाथन गुरूमुर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) हे सन्माननीय पाहुण म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम,चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्कूल ऑफ मीडिया अ‍ॅण्ड जर्नालिझमचे प्रमुख डॉ. कंवलजीत सिंग आणि प्रा. अनुराग वर्मा हे उपस्थित होते.

🔹या चार दिवसीय प्रसारमाध्यम व पत्रकार परिषदेत नऊ सत्र होणार आहेत.
1ः मीडिया आणि मनोरंजन उद्योगः आव्हाने पोस्ट कोविड 19
2ः डिजिटल युगातील प्रसारण माध्यमांचे भविष्य
3ः मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता
4ः आंतरराष्ट्रीय एक जागतिक शक्ती म्हणून उद्यासः आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन
5ः फेक न्यूजः सत्यता निराकरणसाठी आधार काय
6ः कम्युनिटी रेडिओ इन इंडियाः काल, आज आणि काल
7ः राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी माध्यमांची भूमिका
8ः सार्वजनिक कल्याणासाठी माध्यमाच्या संप्रेषणाचे माध्यम म्हणून रेडिओची प्रासंगिकता
9ः मीडिया मालकांपुढील आव्हाने आणि भावी दिशा
या व्यतिरिक्त दोन ‘ मीडिया टू मीडिया कनेक्ट’ व दोन ‘ यूथ टू यूथ’ असे सत्र होणार आहेत. महाराष्ट्रातील व देशाच्या विविध राज्यातील प्रतिष्ठित माध्यम समूहांचे मान्यवर प्रमुख सिध्दहस्त संपादक, ख्यातनाम पत्रकार संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, विविध माध्यमातील अनुभवी पत्रकार या परिषदेत सहभागी होणार असून मुख्य विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन व विचारविनिमिय करतील.

यामध्ये श्री. पराग करंदीकर, संपादक, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, प्रोफेसर अमिताभ श्रीवास्तव, जयपूरच्या मनिपाल युनिव्हर्सिटीचे संचालक आणि मीडिया पर्सन, श्री.असित कुमार मोदी, निर्माता, टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा आणि स्वच्छ भारत राजदूत, मुंबई, ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय विद्यापीठाच्या नॅशनल सिक्युरिटी कॉलेजचे प्रमुख, रोरी मेडकॅल्फ, सुशील कुमार शर्मा, ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ, नवी दिल्ली, प्रा.अंग संग नियान, व्याख्याता, कला, डिझाइन आणि मीडिया स्कूल, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, रत्नेश पाठक वरिष्ठ निर्माता, एबीपी न्यूज, दिल्ली, अनुराग पुनेठा, ज्येष्ठ अँकर, लोकसभा टीव्ही, दिल्ली, हितेश शंकर, संपादक, पंचजन्य, दिल्ली, दिनेश गौतम, वरिष्ठ अँकर, टीव्ही 9, दिल्ली, श्री.सुधीर सहस्रनाम, ज्येष्ठ पत्रकार, हैदराबाद, प्रो. लुकास एमएफव्ही जडग्ने, वरिष्ठ व्याख्याता, स्कूल ऑफ आर्ट, डिझाइन आणि मीडिया, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, श्री. गोपाल शर्मा, संपादक, आप की क्रांती, नवी दिल्ली, श्री.रितेश लाखी. मुख्य संपादक, ग्लोबल पंजाब टीव्ही, पंजाब, श्री. हरीश पराशर, सहाय्यक संपादक, राजस्थान पत्रिका, राजस्थान, श्री. शुनाशीर सेन, संपादक, मिड-डे, मुंबई, जयंत माईनकर, ब्युरो चीफ, यूएनआय, मुंबई, प्रा. अविनाश सिंह, दिग्गज पत्रकार, माजी प्रधान प्रतिनिधी, हिंदुस्तान टाईम्स, नवी दिल्ली, सतीश जेकब, माजी भारतीय चीफ ब्यूरो, बीबीसी, नवी दिल्ली, दिनेश कुमार, वरिष्ठ पत्रकार, चंदिगड, जगतरसिंग, ज्येष्ठ पत्रकार व लेखक, चंडीगड, श्रीमती उमा सुधीर, निवासी संपादक, एनडीटीव्ही, हैदराबाद ,प्रोफेसर मे ऑलविन, प्राध्यापक, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर, एस. वेंकट नारायण, अध्यक्ष, फॉरेन कॉरेस्पोंडेन्टिव्ह क्लब ऑफ दक्षिण एशिया, दिल्ली, डॉ. ग्लेन फुलर, असोसिएट प्रोफेसर, न्यूज अ‍ॅण्ड मीडिया रिसर्च, ऑस्ट्रेलिया, पीआयओ टीव्ही प्रा. चे अध्यक्ष मुनीष गुप्ता. लि. चेअरमन, पीआयओ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अध्यक्ष, मीडियामंत्र, इन्क. सिमरन सोढी, स्तंभलेखक, दिल्ली, डॉ. वायल आववाड, ज्येष्ठ पत्रकार, दिल्ली, व्हिक्टोरिया हमाह, कार्यकारी संचालक, पोवा, घानामार्गॉक्स सॉलिनास, पत्रकार, फ्रान्स, श्री. श्रध्दानंद सिताल, अध्यक्ष, ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेन्स, नेदरलँड्स, यशोधन आगळगावकर, बाल हक्क चळवळ, यूएसए डॉ. पॉल काटूस, एज्युकेशन प्रोफेशनल, युईए, डॉ. मनीष जैसल, चित्रपट समालोचक, लखनऊ, श्री.रणजित कपूर, संचालक, अभिनेता आणि पटकथा लेखक, श्री. अजित राय, चित्रपट समालोचक, श्री. कमल शर्मा, वरिष्ठ उद्घोषक, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई, श्री.अनिल चौबे, चित्रपट समालोचक, मध्य प्रदेश, डॉ. कांचन मलिक, प्राध्यापक, संचार अभ्यास विभाग, हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद, पूजा मुराडा, अल्फाज-ए-मेवात, हरियाणा, फ्र बिजो थॉमस रेडिओ मटोली – केरळ, सौ. राधा शुक्ला वक्त की आवाज – यूपी सिस्टर कृष्णा,रेडिओ मधुबन – राजस्थान, ओंकारेश्वर पांडे, अनूप के. मुदगल, मेजर जनरल दिलवर सिंग, डॉ. सतिश मिश्रा, कर्नल जयबॉन सिंग, संजय सिंग, नरिसअली, हयुमायून कासेरा, सुजेय ठाकूर, श्वेता, तरूण जोशी, श्याम शेख, श्री. अभिषेक कुलकर्णी, उर्बने लक्झरी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे संचालक, श्री. विजय दर्डा, लोकमत मीडिया ग्रुप, नवी दिल्ली चे अध्यक्ष, श्री. रॉन रॉय नाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, द फिल्मी मोनक्स, मुंबई , सुश्री श्वेता पोवार, डायरेक्टर, एरिया कम्युनिकेशन्स यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या संदर्भात लिबरल आर्ट, फाइन ऑर्ट, मीडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी सांगितले की, देशातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील. ही राष्ट्रीय परिषद जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी माध्यम व पत्रकारितेतील जाणकार व्यक्तींनी आपला मौलिक सहभाग नोंदवून ह्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा विधायक उद्देश सफल करावा असे आवाहन प्रमुख संयोजकांनी केले आहे.

🔸ही ऑनलाईन परिषद www.mitwpu-ncmj.com या संकेतस्थळावर होणार आहे.