✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.21सप्टेंबर):- मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावून नेला आहे , काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र भर परतीच्या पाऊसाचे आगमन झाले आहे , यातच या पावस बीड जिह्यात हजेरी लाऊन येथील पिकांचे अतोनात लूसकान केले आहे बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे माजलगाव येथील धरण ओव्हर फुल झाले असून त्याचे पाणी सिंधफणा नदीच्या पात्रात सोडन्यात आले आहे .

पावसासह वाऱ्याचाही सतत जोर असल्याने येथील उसाचे पिकं पडापडी होऊन मातीसमान झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांला याचा मोठा फटका बसला आहे , तसेच येथील बाजरी च्या पिकालाही खूप मोठा फटका पासवाने बसला आहे , सतत पावसाचे येणं सुरू असल्यामुळे येथील बाजरीचे पिंक कनसालाच उगवले असुन शेतकरी वर्गांची लूसकान झाली आहे ऊस बाजरी बरोबरच कापूस आणि सोयाबीन पिकालाही हा पावसाचा फटका बसला असून सोयाबीनच्या शेंगाला कोमारे येऊन कापसाची बोंड नासल्या गेली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत अजुन जास्तच भर पडली आहे.

पावसाचे हे बदलत रूप जिल्यातील शेतकऱ्यांसाठी चिंताग्रस्त ठरत असून प्रत्येक शेतकरी यामुळे पावसाच्या लूसकानीने त्रासदायक जीवंन जगत आहे.केलेली मेहनत अन लावलेला पैसा याही वर्षा वाया गेला .यामुळे येथील शेतकरी अडचणीत आला असून , ग्रामीण स्थरावरिल अनेक शेतकऱ्यांची सरकार कडे मागणी करण्यात येत आहे की सरकारने पिकांचे पंचनामे करुन योग्य ती मदत द्यावी अशी येथील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED