“लंकाधिपती, दशानन रावण”

7

                   🔹आध्यात्मिक लेखन🔹

लंकाधीपती दशानन रावण” आपल्याला सर्वाना माहीतच आहे पण, रावणाच्या बऱ्याच काही गोष्टी आपल्याला माहीत नसाव्यात, कारण आपल्याला टेली-व्हिजन वर दाखवणाऱ्या नाट्य कार्यक्रमामध्ये पुर्ण गोष्टी दाखवल्या जातातच असं नाही आणी जरी दाखवल्या तरी त्या कायम लक्षात राहतील असंही नाही. आजच्या युगात रामायण-महाभारत सारखे ग्रंथ फारसे कुणी वाचत नाही. ज्यांनी रामायण सिरीयल पाहीले, किंवा ज्यांनी रामायण वाचले त्या मध्ये बऱ्याच लोकांना असे वाटतं की “रावण” हा फक्त एक क्रुर राक्षस होता.

हो, अगदी खरे आहे. कारण आपण “रावण” ह्या पात्रा बद्दल सर्व काही वाईटचं ऐकत, पाहत आलो आहे. “रावण” क्रुर राक्षस होता, त्याने सितेला पळवले, त्याने देव-देवतांवर खुप अत्याचार केले म्हणून तेव्हा पासुन रावणाला वाईट समजल्या जाते. पण विचार करुन पहा, “सिता” पळवलीच नसती तर रामायण घडले नसते. रावणाला मुक्ती मिळाली नसती. रावणाचे अत्याचार वाढत गेले असते. होय ना? काही गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. पण आपण अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करताच सर्व निर्णय घेतो. हे चुकीचं आहे.

“लंकाधिश रावण” हे सारस्वत ब्राम्हण पुलस्त्य ऋषी यांचा पौत्र ‘ आई – कैकसी, वडिल-विश्रवा ‘ यांचे पुत्र होते. तसेच “रावण” अत्यन्त बलवान , महापराक्रमी, परमप्रतापी राजा होते, शास्त्रामध्ये प्रखर ज्ञानी, सर्व गोष्टीमध्ये परीपुर्ण विद्वान, पंडित, महाज्ञानी, आणि शिव शंकराचा असीम भक्त होते. असे ऐकवल्या जाते की “रावण” शंकराची पुजा करायला बसले कि त्यांची “पुजा” तब्बल ‘आठ तास’ चालत असे. तसेच रावणाची संपुर्ण लंका ही सोन्याची बनवली होती. त्या काळात लोक त्यांना कुबेरचा पूर्वाधिकारी म्हणत असत.. लंकेला “सोन्याची नगरी” असे सुध्दा संबोधल्या जात होते.

रावणाचा विवाह मध्यप्रदेशातील “मंदासौर” जिल्यामधुन “मंदोदरी” ह्या राजकुमारी सोबत झाला होता.
“महाराणी मंदोदरी पासुन रावणाला दोन मुली व पाच मुले झाली.
त्यांची नावे.. मेघनाथ (इंद्रजीत), अक्षयकुमार, देवांतक, त्रिशिर, प्रहस्त, अतिकाया आणि नरांतका असे होते.

“रावणाची विचार शक्ती दहा लोकांच्या इतकी होती. “रावणाने” भगवान शंकराला अमरत्वाचे वरदान मागीतले तेव्हा त्याने दहा वेळा मस्तक कापुन शंकराला दान केले होते. व एका गोष्टीचा दहा वेळा विचार करुन तो कार्य करत होता. तेव्हा पासुन रावणाला “दशानन” नावाने सुध्दा ओळखल्या जाते.
रावणाचा भय सर्व देवलोकांवरही होते. रावणाला सर्व तेहतीस कोटी देव घाबरत असतं.

“रावण, भगवान शंकराकडून वरदान मागीतल्यावरही संतुष्ट झाला नाही आणी त्याने ब्रम्हदेवाची आराधना केली व ब्रम्हदेवाकडून “जीवनअमृत” मिळवले, ब्रम्हदेवाने रावणाला अमृताची कुपी दिली आणि सांगीतले “रावणा, तू ह्या कुपीचे रक्षण कर. ठरल्या प्रमाणे रावणाने ती कुपी आपल्या पोटाच्या नाभीत लपवून ठेवली. आणि सर्व देव लोकाच , पृथ्वीवर , ऋषी मुनींवर आश्रमात जाऊन हाहाकार माजवला होता. त्यांचे सर्व यज्ञ असफल करुन टाकले होते. रावणाच्या जवळ यायची हिंम्मतही कोणाची होत नसे. तेव्हा पासुन काही लोक रावणाला ब्रम्हानंद सुध्दा म्हणतात.

काही राज्यात, देशात रावणाची वेगवेगळ्या नावाने पुजा केली जाते..
“१) कई रावण… लंका (२) बसेरावण… ईराक (३) महिरावण… क्रोएसिया (४) बहिरावण….भूमध्य (५) मेरावण…आर्मोनिया (६) इस्राहिरावण….इस्राइल (७) दहिरावण…सउदी अरब (८) तहिरावण…ईराक (९) कहिरावण…मिश्र व (१० ) अहिरावण…अाफ्रीका इ. देश हे रावणाला पुजतात.

रावणाने आपली बहीण शृपनखेच्या सांगण्यावरून, तिने केलेल्या असत्य कथनातून सुड बुद्धीने सितेचे अपहरण केले. आणी आपला अंत जवळ केला. रावणाने गर्वात येऊन बरेच पाप केले होते. आणी त्याला गर्व आला कि आपले मरन होनार नाही, ह्या तिन्ही विश्वात आपल्याला टक्कर देनारे कुणीही देव किंवा दैत्य नाही. त्याचा हा गर्वच त्याच्या अंताचे कारण झाले. श्रीरामाचा जन्म सुध्दा रावणाला मारण्यासाठीच झाला होता. नाहीतर “रामायण” कसे घडले असते ? रावणाला सुद्धा मुक्ती मिळाली नसती. तसेही “श्रीराम” भगवान विष्णूचे अवतार असल्या मुळे , रावणाला मोक्षप्राप्ती यांच्या हातून होत आहे म्हटल्यावर काही प्रश्रचं नाही…
म्हणून रावणाने स्वत:चेच मरन स्विकारले व “सितेचे” अपहरण केले. येनाऱ्या पिढीला आठवणीत रहावे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप झाले तेव्हा तेव्हा देवांनी अवतार घेतला, आणि त्यांचा वध केला.

“रावण” सारखा श्रेष्ठही कोणीच नाही. सितेचे, अपहरण केल्यावरही रावणाने सितेच्या पवित्रतेचा कधीच भंग केला नाही. तसा रावणही दयावान होता. काही ग्रंथामध्ये मध्ये असे सुध्दा लिहल्या गेले आहे की “श्रीराम व रावणाचे वैर त्यामुळे तो इतका विद्वान, महान भक्त असुन एका चुकीमुळे त्याला साधारण मानवरूपातील श्रीरामाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या मुळे झाले होते. पण ह्या सर्व नियतीने गोष्टी घडवून आणल्या होत्या.

आपण दर वर्षी विजयादशमी ला रावणाला जाळतो, त्याचे कारण असे की येनाऱ्या पिढीला काही तरी शिकण्यास मिळावे की “रावण” का जाळल्या जातो.
ज्या दिवशी रावणाला जाळल्या जाते , त्या दिवशी काही आदीवाशी समाज व मुद्गल गोत्राचे दवे ब्राम्हण आजही स्वताला ‘रावणाचे’ वंशज समजतात. या समाजासाठी हा दु:खाचा दिवस असतो असे मानल्या जाते.
या शिवाय भारतात काकीनाडा….आंध्र प्रदेश, कोलार…कर्नाटक, मंदासौर जिल्यातील खानापुर….मध्यप्रदेश या ठिकाणी रावणाची ३५ फुटाची भव्य मुर्ती उभारलेली आहे , बिसरख…उत्तरप्रदेश, बैजनाथ…हिमाचल प्रदेश, चांदपोल….जोधपुर – राजस्थान, रावणग्राम….मध्ये प्रदेश, रावणरुंडी…मध्य प्रदेश, शिवनगरी कांगडा…हिमाचल प्रदेश, कानपुर ….उत्तर प्रदेश. या ठिकाणी रावणाची सन्मानपुर्वक पुजा केली जाते.
असे म्हणतात की श्रीराम यांनी स्वत: रावणाच्या ज्ञानाचा आदर केला होता.

करुन शंकराची भक्ती
मिळाली तुला अमरत्वाची युक्ती,
पापाचा घडा भरला जेव्हा
घेतली श्रीराम कडून मुक्ती...

तू अफाट नावाचा सागर
होतास राक्षसांचा आधार,
देव झाले होते शत्रू तुझे
त्यांच्यावरही गाजवला तू अधिकार…

मुर्ती तुझी मोठी दशानन
होते सोन्याचे तुझे भवण,
राजाधिराज ब्रम्हानंद तू
फक्त तुचं लंकेश्वर रावण….

लहान मुलांना आपण ज्या प्रकारे काही गोष्टी सांगतो त्यांच प्रणाने त्याची मनोवृत्ती बदलत जाते. त्या मुळे कुठल्याही गोष्टी सांगताना सविस्तर माहिती पुर्वक सांगाव्या. कारण गैरसमज हे जगात पसरलेले सर्वात भयंकर विष आहे. बऱ्याच लोकांना रावणाला बद्दल पुर्ण माहीती नसावी म्हणून मी आज हे आध्यात्मिक लेखन लिहले आहे!

(वरील लिहलेले आध्यात्मिक लेखन, याची काही सखोल माहीती मिळवून लंकाधिपती “रावण” यांच्या बद्दल थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे!)

✒️कवी/लेखक:-शब्दशृंगार,तु फक्त माझीच
विशाल पाटील , वेरुळकर
मो:-9307829542