दिव्यांग विद्यार्थाला शासनाने वाऱ्यावर सोडले – प्रमोद डोंगरे

38

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील केकत पांगरी गावातील भूमीहीन मजुरांच्या कुंटुबातील दिव्यांग विद्यार्थी मागील चौदा वर्षापासून अंथरुणावर खिळ धरून आहे . शासनाची एकही योजना या विद्यार्थ्यांला कुंटुबातील सदस्यांना मिळत कोणत्याही योजना मिळत नसल्याने कुंटुबातील लोकांची गरिब परिस्थितीमुळे आाता मोठी फरफट होऊ लागली आहे.

तब्बल चौदा वर्षापासून अंथरुणावर खिळ धरून असलेल्या या मुलाला शासकीय अन्न धान्य, दिव्यांग सायकल, पगार, शिष्यवृत्ती अथवा इतर कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने व गेवराई तालुक्यातील राजकीय पुढारी दिव्यांग बांधवांकडे किंवा त्यांच्या कुंटुबाकडे दुर्लक्ष करतात. हे पुढारी फक्त मते मागण्यासाठी आहेत का.. असा प्रश्न गेवराई तालुक्यातील सर्व सामान्य दिव्यांग बांधवांना पडले आहे.

दिव्यांग बांधवांच्या ग्रामपंचायत ५ टक्के निधी काही ठिकाणी प्रलंबित आहेत..किराणा किट व समाज कल्याण विभागाकडून सर्व योजनांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.. रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनिल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली सर्व गावपातळीवर दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून आम्ही आमच्या पद्धतीने ते समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांच्या सोबत तत्पर राहिलोत दिव्यांग बांधवांच्या बाबतीत कुठेही असे काही घडत असल्यास आम्ही ग्रामपंचायत मेंबर पासून ते तहसील कार्यालय पर्यंत पोहचवून न्याय मिळवून देऊ पण काही अधिकारी हलगर्जीपणा केल्यास आम्ही त्यांच्या कार्यालयात घुसून ठोकून काढू यांत आम्ही काही मागे वळून बघणार नाहीत यात शंका नाही.

आम्ही आजपर्यंत शेकडो लोकांना मदतीचा भार दिला कुठेही कमी पडलो नाही . पण सर्व सामान्य माणसाच्या आशिर्वादाने आम्ही हजारो लोकांच्या समोर पोहचलो आहोत .. दिव्यांग बांधवांच्या ५ टक्के निधी संदर्भात जर का ग्रामसेवक, सरपंच टाळाटाळ करत असतील किंवा स्वतः ची भरणी भरत असतील तर त्याला त्याच्या घरात जाऊन मारायला आम्ही मागे बघणार नाही.. लक्षात असु द्या. मनमानी कारभार आता मागे सोडा तुम्हाला जॉब विचारलाच पाहिजे. असे रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा सचिव प्रमोद डोंगरे यांनी आमच्या प्रतिनिधी यांना सांगितले आहे.