कुंटूर पोलीस स्टेशन चे निरीक्षक करीम.एस.पठाण यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव प्रदान

  34

  ?कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टने दिला पुरस्कार

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:- 7757073260

  नांदेड(दि.21सप्टेंबर):-कोरोना व्हायरस/कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकटात कुंटूर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष निरीक्षक मा,पठाण साहेब व पोलीस स्टाॅप आपले कर्तव्य व मानवतेच्या दृष्टीने कोवीड-१९ या विषाणूंच्या विरोधी कुंन्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील ४५ गांवामध्ये शांतता राहावी म्हणून अत्यंत जबाबदारीने चोख बंदोबस्त ठेऊन कोरोना विरोधात जनजागृती केली.

  या काळात जवळपास एक पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी कोरोनाची लागण झाली होती त्या कोरोना वर मात करुन आपल्या डीवटीवर रुजु झाले व मा पोलिस निरीक्षक करीम,एस, पठाण यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या या उल्लेखनीय जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट याच्या वतीने ट्रस्ट चे जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर पत्रकार साईनाथ कानोले यांच्या पुढाकारातून कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव पुरस्कार पत्रकार साईनाथ कानोले यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले, यावेळी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी हानमंते दिगांबर जुंबाडे उपस्थित होते.

  ट्रस्टच्या टिमने कर्तव्य दक्ष मा,करीम एस पठाण साहेब त्यांच्या कार्याची प्रशंसा केली कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर तसेच पत्रकार कोनोले साईनाथ गणपतराव रूईकर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केली.