उदगीरचे नूतन सभापती शिवाजीराव मुळे व उप सभापती बाळासाहेब मरलापल्ले यांचा सत्कार संपन्न

    41

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.21सप्टेंबर):-उदगीर पंचायत समितीचे नूतन सभापती शिवाजीराव मुळे यांचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या वतीने करण्यात आला. या वेळी उदगीर पंचायत समितीचे नूतन सभापती शिवाजीराव मुळे व उप सभापती बाळासाहेब मरलापल्ले यांचा शाल, श्रीफळ व वंदनीय बच्चूभाऊ कडू यांचा लोकनायक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे,ता.उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, सहसंपर्क प्रमुख सुनील केंद्रे,ता.संघटक सुर्यभान मामा चिखले,ता.प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी,ता.सरचिटणीस अविनाश शिंदे,ता.उपाध्यक्ष संदीप पवार,ता.चिटणीस गोपाल नवरखेले,तालुका विद्यार्थी अध्यक्ष आकाश राठोड ,शेषराव भोसले,अंगद मुळे, निळकंठ मुदोळकर ,गणेश कांबळे,संदीप सुर्यवंशी,श्रीकृष्ण होळे,राजकुमार पाटील इतर प्रहार सेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.