✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

नवी मुंबई(दि.२१सप्टेंबर):- अरविंदो मिरा या सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेतर्फे नवी मुंबईतील अनेक पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक पत्रकारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

कोरोना काळात बातम्यांचे संकलन करताना पत्रकारांचा संपर्क समाजातील अनेक घटकांशी येत असतो. पत्रकार हे अहोरात्र आपले काम करीत असतात. त्यामुळे कोरोना पासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून अरविंदो मीरा या संस्थेतर्फे अनेक पत्रकारांना आज मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याचा लाभ नवी मुंबईतील अनेक पत्रकारांनी घेऊन संस्थेचे आभार मानले.

येत्या काही दिवसात इतर भागातील पत्रकार, सफाई कामगार, ब्युटीशियन, स्लम भागात मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे अरविंदो मीरा या संस्थेच्या अध्यक्षा, चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांनी सांगितले. तर ॲड. नागराज, हास्यसम्राट जयंत ओक, प्रसाद कोलते, विजया लक्ष्मी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED