हभप बापु महाराज देवरगांवकर यांचे निधन

  44

  🔸जिल्ह्यातील संत परंपरेतील एक तारा निखळला – माधव महाराज घोटेकर

  ✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

  नाशिक(दि.21सप्टेंबर):-तालुक्यातील देवरगांवचे थोर संत हभप बापु महाराज पालवे यांचे ९२ व्या वर्षी काल सायं.पाच वाजता वैकुंठगमण झाले. ते कलीयुगातील वैराग्य पुरुष व निष्कलंक त्यागी अस जीवन जगले,त्यांचे जाण्याने वारकरी संप्रदायाचे एक चालती बोलती गाथा मुर्ती हरपली असे वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर यांनी आपली भावना व्यक्त केली.

  जिल्हाउपाध्यक्ष माधव महाराज घोटेकर खेडलेकर म्हणाले,नाशिक जिल्ह्याची संत परंपरेतील बापु महाराज शान,ज्यांच्या विचाराकडे सर्वांचे होते,कान,ज्यांना जीवनसुत्राचे सापडले होते भान,संपुर्ण जिल्हाभर ज्यांना होता .मान,नेहमीच ज्यांना असायचे पांडुरंगाचे ध्यान पाठीमागे सर्वच गातात त्यांचे गुणगान किर्तनाला बापु बाबा असल्यावर कधीच पडत नव्हती प्रमाणाची वाण वैराग्याच ज्यांनी पेटवल आपल्या जीवनात रान असे बापु बाबांचे देवरगांव हे गांव,ज्यांनी भक्तीने वाढवल जिल्ह्याच खरोखर नांव,पंचक्रोशीत संप्रदायाला खरोखर त्यांचेकडे श्रवणासाठी होती शिष्य व वारकरी भाविकांची धाव,त्यांनी खरोखर अजरामर केले देवरगांवचे नांव.असे बापु महाराज थोर संत होते. संत परंपरेतीलजिल्ह्याचा एक तारा निखळला असे हभपश्री.माधव महाराज शास्री घोटेकर यांनी बापु महाराजांना श्रध्दांजली अर्पन करतांना म्हटले आहे.

  कार्याध्यक्ष हभपश्री.रामेश्वर महाराज शास्री, द्वाराचार्य हभपश्री.रामकृष्ण महाराज लहवीतकर,जिल्हा मार्गदर्शक प्रमुख हभपश्री.श्रावण महाराज आहिरे, मार्गदर्शक सदस्य हभपश्री.प्रल्हाद महाराज शास्री, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हभपश्री.निवृत्ती महाराज कापसे,हभपश्री.दामोदर महाराज गावले,हभपश्री.पोपटराव फडोळ,हभपश्री. जयंत महाराज गोसावी,हभपश्री.मुरलीधर देवराम पाटील,हभपश्री.दत्तात्रय डुकरेपाटील,हभपश्री हरिश्चंद्र आप्पा भवर,हभपश्री आनंदा महाराज महाले,हभपश्री. रामनाथ महाराज धोंडगे,हभपश्री.रामनाथ महाराज शिलापुरकर ,हभपश्री.पंडीत महाराज गुरुजी,हभपश्री.शिवाजी महाराज चौधरी,ज्ञानेश्वर महाराड जय्यतमल,विलास महाराज चव्हाण,सुभाष महाराज जाधव, मखमलाबादचे हभपश्री.बाळासाहेब महाराज काकड, तालुकाध्यक्ष हभपश्री.लहुजी महाराज आहिरे,युवासमिती जिल्हाध्यक्ष हभपश्री.संदिप महाराज खकाळे,जिल्हासदस्य हभपश्री हिरामण महाराज देवरगांवकर, हभपश्री.ज्ञानेश्वर महाराज देवरगांवकर,हभपश्री.पुंडलिकराव थेटे पेठ तालुकाअध्यक्ष हभपश्री.वालवणे गुरुजी,त्रंबक तालुकाध्यक्ष हभपश्री. देवीदास महाराज जाधव,सचिव हभपश्री.विवेक महाराज नांदुर्डीकर यांनी ही खेद व्यक्त केला आहे. असे हभपश्री.बाळासाहेब महाराज काकड मखमलाबाद यांनी कळविले आहे.