मराठा समाजाचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावे – बाबासाहेबराजे भोसले पाटील

24

✒️माधव शिंदें(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

उमरी(दि.21सप्टेंबर):- मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात शिवविचार प्रतिष्ठान आयोजित सकल मराठा समाजाची चिंतन बैठक व पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. या बैठकीस व्हीडीओ काॅन्फरसद्वारे व्यंकोजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज बाबासाहेबराजे भोसले पाटील, प्रसिद्ध शिवव्याख्यानकार प्रा.बालाजी पाटील गाढे,व प्रा.यादवराव शिंदे सरांनी मार्गदर्शन केले.

मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्यासंदर्भात शिवविचार प्रतिष्ठान आयोजित सकल मराठा समाजाची चिंतन बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यात बोलताना बाबासाहेबराजे भोसले पाटील यांनी खा. छत्रपती संभाजीराजे यांच्यात नेतृत्व करण्याची धमक असुन त्यांनीच मराठा समाजाचे नेतृत्व करावे व मराठा समाजासहीत अठरापगड जातींनाही न्याय मिळवून द्यावा.तर बालाजी पाटील गाढे व यादवरावराव शिंदे सर यांनी सुद्धा यास सहमती दर्शवली असुन आता सर्वांचे लक्ष संभाजीराजे यांच्याकडे लागले आहे.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष शिवविचार प्रतिष्ठानचे संस्थापक तथा छावाचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे हे होते.यावेळी योगेश पाटील मोरे,बालाजी पाटील ढगे, अविनाश पाटील हिवराळे, कैलास पाटील कदम, दत्ताहारी पाटील ढगे, प्रविण पाटील सावंत,विजय पाटील कदम, किशन कदम,शिवराज सावंत,अनसाजी पाटील जिगळेकर, गजानन शिंदे, सुनिल पाटील शिंदे,योगेश शिंदे,संभाजी ढगे, विलास लोहगावे, गणेश वडजे,कृष्णा तांदळे, संदीप मनुरकर,अक्षय कवळे,पांडुरंग कवळे, यासह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.