कोंब फुटलेल्या सोयाबीनचा सर्वे करा – भूमिपुत्राची मागणी

    65

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

    सेनगाव(दि.22सप्टेंबर):-रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटत आहेत असला प्रकार या आधी कधीच झाला नाही यावर कृषी शास्त्रज्ञांनी संशोधन करून उपाय सुचवावा असे निवेदन भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना 21 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे.

    सोयाबीन काढणी ला सुरुवात होत आहे. परंतु ज्या शेंगा हिरव्या व पकव झाल्या आहेत त्यांना अचानक कोंब यायला लागले आहेत. हिरव्या व न वाळलेल्या पिकाला यापूर्वी कधीच कोंब आलेले नाहीत यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. असे असतानाही कृषी विभाग व शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप निवेदनाद्वारे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने केला. याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशीही मागणी करण्यात आली.

    यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर, युवक तालुका उपाध्यक्ष नितीन गाडे, रिसोडचे शहर संघटक राहुल डांगे,जि.प.स. अध्यक्ष लोणीचे समाधान गाडे,जि.प.स. अध्यक्ष भरचे संतोष गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे मयूर हिवाळे, रवि मंडलिक, तुकाराम मोरे, युवा नेते भूमिपुत्र शेतकरी संघटना विष्णू मुंडे यांची उपस्थिती होती.